प्लॅनिंग बोंबलेल म्हणून पाळी पुढे करण्याच्या गोळ्या घेत असाल, तर 'या' गंभीर समस्यांचे व्हाल शिकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 12:37 PM2020-02-16T12:37:00+5:302020-02-16T12:48:58+5:30
मासिक पाळी ही अनेक महिलांना तारिख असते त्याच वेळी येईल असं नाही.
(image credit- medical news today)
मासिक पाळी ही अनेक महिलांना तारिख असते त्याच वेळी येईल असं नाही. तारखेच्या मागे तर कधी आधीच पाळी येते. त्यामुळे आपलं ठरलेलं प्लॅनिंग बोंबलतं. कारण जास्त वेदना होत असताना आपण कोणतेही काम करू शकत नाही किंवा घरी एखादं धार्मिक कार्य असेल तर आपण या गोळ्या घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का पाळी पुढे ढकल्याची गोळी घेण्याचे तुम्ही विचारही केला नसेल असे अनेक दुष्परिणाम आहेत.
(Image credit- everyday health)
मेंस्ट्रल साइकलवर परिणाम होतो
जर तुम्ही पाळी पुढे करण्यासाठी गोळी घेत असाल तर तुमच्या मासिक पाळीच्या सायकलवर याचा परीणाम होऊ शकतो. तसंच गर्भधारणेच्यावेळी सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक नकारात्मक बदल घडून येतात. यामुळे पाळी कायमची बंद किंवा उशीरा येण्याची समस्या सुद्धा उद्भवू शकते.
नसांमध्ये त्रास
पाळी उशीरा येण्याच्या गोळ्या खाल्ल्यामुळे तुम्हाला गंभीर आजारांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. त्यामुळे ब्लड क्लॉट होण्याची समस्या उद्भवू शकते. ब्लड क्लॉट होण्याचा त्रास वाढून जर तो मेंदूपर्यंत किंवा हृदयापर्यंत पोहोचला तर मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. चिडचिडेपणा जास्त होतो, मळमळणे, डोकेदुखी, स्तनामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. स्तन जड झाल्यासारखे वाटू लागतात.
हेवी ब्लिडिंग
या टॅब्लेट्स खाल्यामुळे २० टक्के महिलांना हेवी ब्लिडिंग होत असतं आणि हीच स्थिती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्हाला रक्तस्त्राव न थांबल्यामुळे मोठे आजार होण्याची शक्यता असते. पाळी कायमची अनियमित होते तसंच हार्मोनल बदल घडून येतात.
डायरिया आणि पोटदुखी
मासिक पाळी पुढे करण्यासाठी जर तुम्ही गोळ्या घेत असाल तर पोटदुखीचा त्रास जास्त होतो.त्यामुळे क्रॅम्प्स येतात. वजायनल ब्लिडिंग सुद्धा होतं.पायापासून मेंदूपर्यंत शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते. लिव्हरला इजा होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक!)
याशिवाय मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्या सारख्याच असतात असा अनेकांचा समज आहे. मात्र यामध्ये तथ्य नाही. गर्भनिरोधक गोळ्या ओव्हॅल्युशन करत नाही. त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होत नाही. तर पाळी पुढे करण्याच्या गोळ्यांंमधून गर्भाशयाच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणा रोखता येत नाही. या गोळ्यांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोना व्हायरसवर उपाय सापडल्याचा चीनचा दावा, जाणून घ्या काय आहे तथ्य! )