आजारपणात पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय आहे? जरा थांबा; 'हे' वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 06:04 PM2018-07-03T18:04:11+5:302018-07-03T18:04:30+5:30

अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Taking pills without water is injurious to health | आजारपणात पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय आहे? जरा थांबा; 'हे' वाचा!

आजारपणात पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय आहे? जरा थांबा; 'हे' वाचा!

googlenewsNext

मुंबई - अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एका रिसर्चमध्ये असे सिद्ध झाले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ति पाण्याशिवाय गोळ्या खाते त्यावेळी त्याच्या अन्ननलिकेला नुकसान पोहोचते.

आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेमार्फत आपल्या पोटात जातं. रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, पाण्याशिवाय गोळ्या घेतल्याने त्या अन्ननलिकेतून जात असताना अन्ननलिकेला चिटकतात. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो, असे झाल्यास छातीत जळजळ किंवा छातीत दुखणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते. 

पाण्याशिवाय औषधाच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा त्रास जाणवतही नाही अशावेळी अंतर्गत रक्तस्रावाचा धोका अधिक असतो. जर एखाद्या व्यक्तीला पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय असेल तर अन्ननलिकेमध्ये अल्सर होण्याचाही धोका उद्भवतो. टर्किश जर्नल ऑफ गेस्ट्रोअंथ्रोलॉजीच्या एका रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. रिचर्समध्ये सांगण्यात आल्यानुसार, व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स ज्या सहज पाण्याशिवाय घेता येतात त्याही पाण्यासोबतच घेणे गरजेचे आहे. 

पाण्याशिवाय गोळ्या घेण्याचे टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्यामुळे गोळ्या घेताना त्या पाण्यासोबतच घेतल्या पाहिजेत. याव्यतिरिक्त झोपून गोळ्या घेणेही टाळावे. कारण झोपून गोळ्या घेतल्याने गोळ्यांची अन्ननलिकेस चिकटण्याची शक्यता जास्त असते.  

Web Title: Taking pills without water is injurious to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.