या आंबट फळाच्या ज्यूसने लगेच कमी होईल पोट आणि कंबरेवरील चरबी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:16 AM2023-01-06T09:16:59+5:302023-01-06T09:17:59+5:30
Weight Loss : आज आम्ही तुम्हाला अशा फळाबाबत सांगणार आहोत जे टेस्टमध्ये खूप आंबट आणि चटपटीत असतं. याच्या मदतीने तुम्ही पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करू शकता.
Tamarind Juice For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी तुम्हाला गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण शुगर फॅटमध्ये रूपांतरित होतं आणि वजन वेगाने वाढू लागतं. पण आंबट पदार्थांमुळे आरोग्यावर कसा प्रभाव पडतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आज आम्ही तुम्हाला अशा फळाबाबत सांगणार आहोत जे टेस्टमध्ये खूप आंबट आणि चटपटीत असतं. याच्या मदतीने तुम्ही पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करू शकता.
प्रसिद्ध डायटिशियन आयुषी यादव यांनी सांगितलं की, चिंचेचा ज्यूस नियमितपणे सेवन केला तर वेगाने वजन कमी होतं. कारण या फळामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सशिवाय फायबरही भरपूर असतं. याचा प्रभाव आरोग्यावर काही दिवसांमध्येच दिसणं सुरू होतं.
चिंचेचा ज्यूस चवीला तर चांगला असतोच, सोबतच आपल्या शरीरासाठीही फायदेशीर असतो. यात माइल्ड ड्यूरेटिक तत्व आढळतात. ज्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यात फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि मग तुम्ही जास्त खात नाहीत. याने वजन कंट्रोल राहतं.
चिंचेचा ज्यूस डायजेशनसाठीही चांगला असतो. जर पचन तंत्र चांगलं राहिलं तर वजन कमी फार सोपं होईल. सोबतच या ड्रिंकच्या मदतीने बॅड कोलेस्ट्रॉलही कमी करता येतं. जे फिटनेससाठी फार आवश्यक आहे.
चिंचेचा ज्यूस तयार करण्यासाठी आधी चिंचा पाण्याने चांगल्या धुवून घ्या आणि मग त्याच्या बीया काढा. आता 2 ग्लास पाणी उकडून घ्या आणि त्यात चिंचा टाकून थोडा वेळ गरम करा. आता हे पाणी चाळणीतून गाळून घ्या. हे पाणी थंड झालं की, सेवन करा.