चिंताजनक! कोरोना विषाणूंपेक्षा 'या' दोन आजारांचा धोका जास्त; वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:02 AM2020-05-25T11:02:35+5:302020-05-25T11:03:46+5:30
या आजारांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं.
सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीतीचं वातावरण तयार झालं आहे. तेच लॉकडाऊन असल्यामुळे लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होण्यापासून वाचवता येऊ शकतं. अलिकडे संशोधकांनी दावा केला आहे की, कोरोना विषाणूंपेक्षा टीबी आणि कॉलरा या रोगाने मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे.
देशात या दोन आजारांचे प्रमाण जास्त आहे. टीबी आणि कॉलरा या आजारांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. लॉकडाऊनमुळे किंवा उपचारांद्वारे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे. पण या दोन आजारांमुळे अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.
हैदराबादच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक वी रमण धारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीबी, कुपोषण यांसारख्या आजारांवरही विचार करणं गरजेचं आहे. तसंच कोरोनामुळे जीव वाचलेल्या लोकांच्या तुलनेत या दोन आजारांनी मृत्यू होत असलेल्यांची संख्या जर वाढली तर लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असं सुद्धा त्यांनी सांगितले.
भारतात कोरोना विषाणूंची लागण एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी झाली आहे. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असला तरी कोरोनातून बाहेर येत असेल्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या माहामारीसोबतच इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी तपासणी आणि उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाची लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांमार्फत संक्रमणाचा धोका ५० टक्के कमी; तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus : कोरोना विषाणूंवर उपचारांसाठी HIV च्या औषधापेक्षा प्रभावी ठरेल चहा; तज्ज्ञांचा खुलासा