महिना झाला खोकला काही कमी होत नाही ? दुर्लक्ष केल्यास नंतर पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:54 PM2022-11-18T12:54:18+5:302022-11-18T12:57:00+5:30
हिवाळा सुरु झाला की सर्दी, खोकला, ताप येणे स्वाभाविक आहे. परंतु अनेकदा या साध्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. साध्या खोकल्यामुळे घाबरण्याची गरज नाही मात्र खोकला वाढला तर त्यावर उपाय करणे तितकेच गरजेचे आहे.
हिवाळा सुरु झाला की सर्दी, खोकला, ताप येणे स्वाभाविक आहे. परंतु अनेकदा या साध्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. साध्या खोकल्यामुळे घाबरण्याची गरज नाही मात्र खोकला वाढला तर त्यावर उपाय करणे तितकेच गरजेचे आहे. जर कधी खोकला थांबतच नसेल तर हे गंभीर लक्षण आहे. अनेक घरगुती उपाय केल्यानंतरही खोकला थांबत नसेल तर हे कोणत्या ना कोणत्या आजाराचे गंभीर लक्षण असु शकते. यावेळी त्वरित रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी.
अनेक दिवस राहणारा खोकला
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार एक आठवड्यापेक्षा जास्त खोकला राहिला असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे Tuberculosis क्षयरोगाचे चे लक्षण असु शकते. टीबी झाल्याचे वेळीच निदर्शनास आले तर त्याचा धोका टाळता येऊ शकतो.
टीबी गंभीर आजार
अनेक वेळा टीबी मुळे होणारा खोकला एक महिन्यांहुनही जास्त काळ राहु शकतो. याचे वेळीच योग्य उपचार केले नाही तर हे मृत्युचे कारण देखील होऊ शकते. टीबी कोणालाही कधीही होऊ शकतो.
टीबी ची लक्षणे
महिनाभर खोकला राहणे
संध्याकाळी किंवा रात्री खोकला जास्तच वाढणे
छातीत दुखणे
वजन झपाट्याने कमी होणे
भूक कमी लागणे
काय काळजी घ्याल
नवजात बालकांना एक महिन्याच्या आत बी सी जी ची लस देणे बंधनकारक आहे.
कोणत्याही टीबी च्या रुग्णाजवळ गेलात तर तोंडावर रुमाल ठेवा