चहाचे अतिसेवन घातकच !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 06:34 PM2016-11-24T18:34:05+5:302016-11-24T18:34:05+5:30

भारतातील प्रत्येक नागरिकाला दिवसभरात कधीही आणि कितीही चहा पिण्याची सवय आहे. मात्र, चहाचे अतिसेवन हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे हे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे.

Tea superficial deadly! | चहाचे अतिसेवन घातकच !

चहाचे अतिसेवन घातकच !

googlenewsNext
रतातील प्रत्येक नागरिकाला दिवसभरात कधीही आणि कितीही चहा पिण्याची सवय आहे. मात्र, चहाचे अतिसेवन हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे हे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे. अति उकळलेला ५ ते १० कप चहा जर आपण दिवसभरातून पित असाल तर आपली पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात. तसेच चहात साखर घालण्याचे भारतीयांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणाºया व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढले जात आहेत. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, रक्तदाब वाढणे, पक्षाघातासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे. टपरीवर चहा अ‍ॅल्यूमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्यूमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो. भारतासारख्या समशितोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला मारक बनतो. 

Web Title: Tea superficial deadly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.