'अशा' निष्काळजीपणामुळे वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या; WHO चा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:21 AM2020-07-17T11:21:53+5:302020-07-17T11:27:54+5:30

CoronaVirus Latest News & Updates : कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे आज जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयानं वाढत आहे. 

Tedros adhanom ghebreyesus the who chief said on covid 19 increasing cases | 'अशा' निष्काळजीपणामुळे वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या; WHO चा धोक्याचा इशारा

'अशा' निष्काळजीपणामुळे वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या; WHO चा धोक्याचा इशारा

Next

कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी सांगितले की, अमेरिका, रशिया आणि आशियातील देशात कोरोना संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे आज जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयानं वाढत आहे. 

संपूर्ण जगभरातील लोकांना कोरोना व्हायरस आपल्या जाळ्यात ओढत आहे. एक्टिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. संक्रमणाला रोखायचं असल्यास जगभरातील लोकांनी मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करणं आणि सतत हात धुण्याची सवय ठेवणं आवश्यक आहे. 

सुरुवातीला अचानकपणे या सवयी स्वतःला लावणं हे आवाहात्मक होते. खासकरून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करण्याचं मान्य केले नव्हते. नंतर त्यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्कचे महत्व लक्षात घेत मास्क वापरायला सुरूवात केली. त्यामुळे देशातील इतर लोकही प्रेरित झाले.

एकिकडे ट्रंप जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख चीफ टेड्रोस यांच्यावर कोरोनाशी निगडीत माहिती लपल्याचा आरोप लावत होते. आता टेड्रोस त्यांच्याकडून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत ट्रंप यांचे नाव घेतले जात आहे. अशा स्थितीत ट्रंप त्यांना दोषी का ठरवलं जातंय  असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  यावर्षी अमेरिकेत निवडणूका आहेत. या निवडणूनका लक्षात घेता ट्रंप यांना लोकांचं घरात बंद राहणं आणि बंदिस्थ जीव जगणं  स्विकार नव्हते. पण अमेरिकेतील लोक कोरोना काळात जेव्हा सामान्य जीवन जगत होते. तेव्हा ही माहामारी जास्त पसरत गेली. 

आता परत अमेरिकेत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.  रशियाच्या काही भागात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. टेड्रोस यांनी सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  अमेरिकेसोबतच ब्राजीलच्या राष्ट्रपतींही कोरोना संक्रमणापासून बचावासाठी मास्क आणि लॉकडाऊनचा विरोध केला. आता ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्य़ेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने ब्राझिलच्या राष्ट्रपतींना दोषी मानले आहे.

आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टेंसिंग यांमुळे कोरोनापासून बचाव होत नसला तरी कोरोना संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो.  संक्रमित व्यक्तीच्या जवळ गेल्यास शिंकण्यातून किंवा खोकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समुळे शरीरात विषाणूंचा प्रवेश होऊ शकतो.  त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर केल्यास आजारातून लवकर बाहेर येण्याची शक्यता असते. 

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

Web Title: Tedros adhanom ghebreyesus the who chief said on covid 19 increasing cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.