हार्ट अटॅकच्या अनेक महिन्यांआधी दातांमध्ये होतो असा बदल, डॉक्टरांच्या या सल्ल्यांकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:26 PM2022-12-06T12:26:47+5:302022-12-06T12:27:17+5:30

Tips for healthy heart: डॉ. वरालक्ष्मी यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी 5 आवश्यक टिप्स दिल्या आहेत. ज्या 45 वयानंतर नक्की फॉलो केल्या पाहिजे. कारण या वयात हृदयरोग होण्याचा धोका जास्त राहतो.

Teeth and gum inflammation could be the early sign of heart attack know important health tips after 45 age | हार्ट अटॅकच्या अनेक महिन्यांआधी दातांमध्ये होतो असा बदल, डॉक्टरांच्या या सल्ल्यांकडे करू नका दुर्लक्ष

हार्ट अटॅकच्या अनेक महिन्यांआधी दातांमध्ये होतो असा बदल, डॉक्टरांच्या या सल्ल्यांकडे करू नका दुर्लक्ष

googlenewsNext

Tips for healthy heart: जगात सगळ्यात जीव हे हृदयरोगांमुळे जातात. साधारण 9 मिलियन लोक दरवर्षी कोरोनरी हार्ट डिजीजमुळे मरण पावतात. आयुर्वेद डॉक्टर वरालक्ष्मी यांनी 5 अशा टिप्स दिल्या आहेत ज्या 45 वयानंतरही तुमचं हृदय हेल्दी ठेवतात.  डॉ. वरालक्ष्मी यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी 5 आवश्यक टिप्स दिल्या आहेत. ज्या 45 वयानंतर नक्की फॉलो केल्या पाहिजे. कारण या वयात हृदयरोग होण्याचा धोका जास्त राहतो.

हार्ट अटॅक आणि दांतांचा संबंध

आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं की, अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, तोंडाची समस्या आणि हृदयरोग यांचा खोलवर संबंध आहे. घाणेरडे दात आणि हिरड्यांमध्ये सूज सोबत हृदयाच्या नसा बंद होण्याची समस्या होऊ शकते. ज्याला हृदयरोगाचं पहिलं लक्षण मानलं जातं. जे बऱ्याच महिन्यांआधी दिसतं. त्यामुळे ऑइल पुलिंग आणि कोमट पाण्याने गुरळा करून तोंडाची स्वच्छता करावी.

45 वयानंतर या तेलात बनवावे पदार्थ

हृदयरोगांपासून वाचण्यासाठी कॅनोला आणि सनफ्लॉवर तेलात पदार्थ बनवू नये. कारण हे हाय प्रोसेस्ड आणि अनस्टेबल ऑइल असतात. ज्यामुळे हृदयात इंफ्लामेशन वाढतं. त्याऐवजी तुम्ही हेल्दी फॅट असलेलं ऑलिव ऑइल, तूप आणि तिळाच्या तेलाचा वापर करा.

हृदयासाठी फायदेशीर मीठ, मसाला आणि फूड

हेल्दी हार्टसाठी फूड - डॉक्टरांनुसार, आंबट फळं हृदयासाठी फार चांगले असतात. खासकरून आवळा आणि चेरीमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात.

फायदेशीर मसाले - वातावरणानुसार डाएटमध्ये लसूण, धने, खारीक आणि मनुक्यांचा समावेश करा.

कसं मीठ खावं - आयुर्वेदिक डॉक्टर संवैध मिठाला हृदयासाठी चांगलं मानतात. 

दररोज 30 मिनिटे चाला

दररोज सरासरी 30 मिनिटे चालल्याने तुम्हाला असणारा हृदयरोगाचा धोका 40 टक्के कमी केला जाऊ शकतो. पायी चालल्याने वजन, कोलेस्ट्रॉल आणि बीपी लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवला जाऊ शकतो.
 

Web Title: Teeth and gum inflammation could be the early sign of heart attack know important health tips after 45 age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.