दातांना येणाऱ्या झिणझिण्यामुळे हैराण आहात? या ५ गोष्टी ठेवा लक्षात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:57 PM2023-01-07T15:57:43+5:302023-01-07T16:25:33+5:30
Teeth Care : लोकांची लाइफस्टाइल सध्या फारच वेगाने बदलत आहे. लोक फास्ट फूड आणि रेडीमेड फूड्सचं सेवन अधिक करत आहेत. यात अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे दातांच्या आवरणाला नुकसान पोहोचतं.
Teeth Care : दातांची सेंसिटिव्हीटी म्हणजेच दातांना येणाऱ्या झिणझिण्या एक सामान्य समस्या आहे. गोड पदार्थ खाल्यावर, थंड पाणी प्यायल्यावर, तसेच थंड पदार्थ जसे की, आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक प्यायल्यानेही दातांना झिणझिण्या येतात. एका अभ्यासानुसार, प्रत्येक ८ पैकी एका व्यक्तीला सेंसिटिव दातांची समस्या असते.
लोकांची लाइफस्टाइल सध्या फारच वेगाने बदलत आहे. लोक फास्ट फूड आणि रेडीमेड फूड्सचं सेवन अधिक करत आहेत. यात अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे दातांच्या आवरणाला नुकसान पोहोचतं. याच कारणाने दातांची ही समस्या अधिक वाढते आहे. जास्तीत जास्त लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात आणि यावर उपाय करत नाहीत. पण खालील ५ गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला ही समस्या होणार नाही.
हलक्या हाताने ब्रश करा
फार जोर लावून ब्रश केल्याने दातांच्या सेंसिटिव्हिटीचा धोका वाढतो. कारण याने दातांवर असलेल्या आवरणाला नुकसान पोहोचतं. त्यासोबतच दातांना मजबूत ठेवणाऱ्या हिरड्याही कमजोर होतात. त्यामुळे हे ध्यानात ठेवा की, नेहमी हलक्या हाताने ब्रस करावा. तसेच ब्रश केल्यावर दातांवर बोटही फिरवा.
जास्त टूथपेस्ट टाळा
अनेकांना सवय असते की, ते ब्रश करतेवेळी ब्रशवर खूपसारं टूथपेस्ट लावतात. पण जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरणे दातांसाठी आणि तोंडासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे काळजी घ्या की, नेहमी मटरच्या दाण्याएवढा टूथपेस्ट घ्यावा. तसेच अनेकांना असे वाटते की, ब्रस करताना जितका जास्त फेस होईल दात तितके जास्त स्वच्छ होतील, पण असे काही नाहीये. ब्रश करतांना दातांमधील घाण स्वच्छ करणे गरजेचे असते, यात टूथपेस्टच्या फेसाने काही फरक पडत नाही.
फ्लोराइड माऊथवॉश वापरा
जर तुमच्या दातांमध्ये सेंसिटिव्हिटीची समस्या जास्त असेल तर हे तुम्हाला महागात पडू शकतं. काही लोकांना साधं पाणी प्यायल्याने आणि थोडं गोड खाल्यानेही समस्या होते. अशात तुम्ही फ्लोराइड माऊथवॉशचा प्रयोग करायला हवा. फ्लोराइड दातांवरील आवरण मजबूत करतं आणि दातांना येणाऱ्या झिणझिण्याही दूर होतात. रोज ब्रश केल्यावर तुम्ही या माऊथवॉशचा वापर करु शकता.
आंबट पदार्थ खाल्यावर ब्रश करा
फळांचा रस, थंड पेय, रेड वाइन, चहा, आइस्क्रीम आणि सिट्रिक फळ जसे की, टोमॅटो, लिंबू, सॅलड ड्रेसिंग आणि लोणचं हे खाऊ नका. कारण या पदार्थामुळे दातांवरील आवरण घासलं जातं. जर हे पदार्थ तुम्ही खाल्ले तरी त्यानंतर ब्रश करा. तसेच काही गोड पदार्थ खाल्यावर पाण्याने गुरळा करा.
ब्रशच्या स्वच्छतेवर द्या लक्ष
जर तुम्ही ब्रथ बाथरुममध्ये ठेवत असाल तर त्यात किटाणू वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रश दुसऱ्या जागेवर ठेवा. जर ब्रशचं कव्हर असेल तर फार उत्तम. अमेरिकन डेंटल अशोसिएशनने सल्ला दिलाय की, ब्रश ३ महिन्यांचा कालावधीनंतर बदलायला हवा. कारण ३ महिन्यांनंतर ब्रशचे दाते खराब होऊ लागतात.