थंड पाणी प्यायले किंवा गोड खाल्लं तर दातांना झिणझिण्या येतात? जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:43 AM2024-06-13T09:43:51+5:302024-06-13T09:54:33+5:30
Teeth Sensitivity Solution : वास्तविक पाहता काही सोप्या गोष्टी करून किंवा काही गोष्टी टाळून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
Teeth Sensitivity Solution : अनेक दातांना झिणझिण्या येण्याची समस्या होत असते. ही समस्या झाली की, ना थंड पाणी पिता येत, ना गोड किंवा आंबड पदार्थ खाता येत. एका रिसर्चनुसार, प्रत्येक ८ पैकी एका व्यक्तीला सेंसिटिव दातांची समस्या असते. पण या समस्येकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता काही सोप्या गोष्टी करून किंवा काही गोष्टी टाळून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
आजकाल लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. फार जास्त तेलकट, मसालेदार, अॅसिडिक पदार्थ खाल्ल्यामुळे लोकांच्या दातांवरील थराचं नुकसान होतं आणि त्यामुळे दात कमजोर होतात आणि दातांवर झिणझिण्या येतात. अशात यावर काय उपाय करता येतील ते खालीलप्रमाणे बघता येईल.
ब्रश करण्याची पद्धत
बरेच लोक दात स्वच्छ करताना फार जोर लावून ब्रश करतात. कारण त्यांचा समज असा असतो की, असं केल्याने दात जास्त स्वच्छ होतील. पण हा समज चुकीचा आहे. असं केल्याने दातांवर असलेल्या आवरणाचं नुकसान होतं. हिरड्याही कमजोर होतात. त्यामुळे नेहमी हलक्या हाताने ब्रश करावा. तसेच ब्रश केल्यावर दातांवर बोटही फिरवा.
किती टूथपेस्ट वापरावी?
बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, टूथपेस्ट जास्त घेतल्याने दात जास्त स्वच्छ होतील. पण हे साफ चुकीचं आहे. अनेक डेंटिस्ट सांगतात की, नेहमी मटरच्या दाण्याएवढं टूथपेस्ट घ्यावं.
माऊथवॉश वापरा
दातांमध्ये सेंसिटिव्हिटीची समस्या असणं याकडे दुर्लक्ष करू नका. काही लोकांना साधं पाणी प्यायल्याने आणि थोडं गोड खाल्यानेही त्रास होतो. अशात तुम्ही फ्लोराइड माऊथवॉशचा प्रयोग करायला हवा. फ्लोराइड दातांवरील आवरण मजबूत करतं आणि दातांना येणाऱ्या झिणझिण्याही दूर होतात.
आंबट पदार्थ खाल्यावर ब्रश करा
फळांचा रस, थंड पेय, रेड वाइन, चहा, आइस्क्रीम आणि सिट्रिक फळं जसे की, टोमॅटो, लिंबू, संत्री, सॅलड ड्रेसिंग आणि लोणचं यांमुळे दातांचं नुकसान होतं. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यानंतर न विसरता ब्रश करावा.
ब्रश कधी बदलावा?
अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, ब्रश ३ महिन्यांच्या कालावधीनंतर बदलायला हवा. कारण ३ महिन्यांनंतर ब्रशचे दाते खराब होऊ लागतात. त्यामुळेही दातांचं नुकसान होतं.