दात पांढरे करण्यासाठी डॉक्टरांना द्यावे लागणार नाही पैसे, घरीच तयार करा 'हे' खास पावडर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:15 PM2024-03-20T15:15:07+5:302024-03-20T15:16:23+5:30

Teeth Whitening Tips : ही काही फार मोठी समस्या नाही, पण अनेकांना पिवळ्या दातांमुळे लाजिरवाण्या स्थितीचा सामना करावा लागतो.

Teeth Whitening Tips : Tips and remedies for teeth whitening at home | दात पांढरे करण्यासाठी डॉक्टरांना द्यावे लागणार नाही पैसे, घरीच तयार करा 'हे' खास पावडर...

दात पांढरे करण्यासाठी डॉक्टरांना द्यावे लागणार नाही पैसे, घरीच तयार करा 'हे' खास पावडर...

Teeth Whitening Powder : अलिकड वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांना दातांना किड लागण्याची आणि दात पिवळे होण्याची समस्या होत आहे. दात जर पिवळे झाले तर चारचौघात मोकळेपणाने हसताही येत नाही. सोबतच आरोग्यासंबंधी अनेक समस्याही होऊ शकतात. ही काही फार मोठी समस्या नाही, पण अनेकांना पिवळ्या दातांमुळे लाजिरवाण्या स्थितीचा सामना करावा लागतो.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी लोक बाजारातील वेगवेगळ्या औषधांचा आणि केमिकल्सचा वापर करतात. पण तरीही त्यांची समस्या काही दूर होत नाही. पण या उपायांमुळे दातांचं आणि हिरड्यांचं नुकसान होऊ शकतं. 

पिवळे दात पांढरे कसे करावे?

एका आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं की, दातांवर जमा झालेला पिवळेपणा दूर करण्यासाठी डेंसिस्ट कमीत कमी दोन हजार ते तीन हजार रूपये फी घेतात. त्याशिवाय बाजारात मिळणारे अनेक औषधं महागडी असतात. त्यात हानिकारक केमिकल्ही असतात. तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय करू शकता.

आयुर्वेदिक पावडर

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठीचं खास पावडर तयार करण्यासाठी एक चमचा संधैव मीठ, एक चमचा लवंग पावडर, एक चमचा दालचीनी, एक चमचा ज्येष्ठमध, कडूलिंबाची सुकलेली काही पाने आणि सुकलेल्या पुदीन्याची पाने हवीत.

कसं कराल तयार?

वरील साहित्य बारीक करून चूर्ण तयार करा. तुमचं पाडवर तयार आहे. हे पावडर एका एअर टाइट डब्यात स्टोर करा. रोज थोड हे पावडर घ्या आणि ब्रशच्या मदतीने दात स्वच्छ करा. नंतर पाण्याने तोंड धुवा. एक आठवडा जरी तुम्ही या पावडरने दात स्वच्छ केले तर तुम्हाला लगेच बदल दिसू लागेल.

यात काय आहे खास

यातील संधैव मीठ हे तुमच्या दातांना नॅचरल पद्धतीने पाढरं करतं. तर ज्येष्ठमध आणि कडूलिंबामुळे हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. संवेदनशील दात असलेल्या लोकांसाठीही हे पावडर फार फायदेशीर आहे. दालचीनी आणि लवंगमुळे दात दुखणं बंद होतं.

दात चमकदार करण्याचे इतर काही उपाय

1) स्ट्रॉबेरी 

स्ट्रॉबेरीचे काही तुकडे बारीक करुन ती पेस्ट दातांवर लावून मसाज करा. दिवसातून दोनदा असे केल्यास दातांचा पिवळेपणा जातो.  

2) संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीने दात साफ केल्यास काही दिवसातच पिवळेपणा जाऊन दात चमकायला लागतात. यासाठी रोज रात्री झोपताना संत्र्याची साल दातांवर घासा. संत्र्याच्या सालमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम असतं. जे दातांची चमक आणि मजबूती कायम ठेवतं. 

3) लिंबू

लिंबूचे नैसर्गिक ब्लिचींग गुणधर्म दातांवरही उपायकारक ठरतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी लिंबाची साल दातांवर घासावी. लिंबू आणि मिठ एकत्र करुन दातांची मसाज करा. असे दोन आठवडे केल्यास दातांचा पिवळेपणा जाणार.  

4) खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल किंवा तिळाच्या तेलाने दात साफ करणे ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. एक चमचा खोबऱ्याचं तेल दातांवर लावा. आठवड्यातून दोनदा असे केल्यास फायदा होईल.

Web Title: Teeth Whitening Tips : Tips and remedies for teeth whitening at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.