हार्टसंबंधी आजारांचा धोका वाढवत आहे तुमची ही सवय, रिसर्चमधून देण्यात आला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 02:43 PM2022-05-26T14:43:18+5:302022-05-26T14:44:10+5:30
Heart Disease : अभ्यासकांनी सल्ला दिला की, टीव्ही बघण्याची सवय केवळ एक तासांपुरतीच ठेवावी. ते म्हणाले की, जेव्हा तुम्हा जास्त वेळ एकाच जागी बसून टीव्ही बघता तेव्हा याने कोरोनरी हार्ट डिजीज होण्याचा धोका १६ टक्के वाढतो.
Heart Disease : आजकालची लाइफस्टाईल आणि आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे बऱ्याच गंभीर आजारांचा धोका वाढू लागतो. ज्यात हार्टसंबंधी आजारांचाही समावेश आहे. जगभरात हार्टसंबंधी आजारांचा धोका सतत वाढत आहे. अशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, काही गोष्टींना आळा घातला तर हार्ट डिजीजचा धोका रोखला जाऊ शकतो.
रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, सतत एकाच जागी बसून टीव्ही बघण्याची सवय सोडली तर हार्ट डिजीजचा धोका रोखला जाऊ शकतो. हा दावा कॅब्रिज यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी केला आहे.
अभ्यासकांनी सल्ला दिला की, टीव्ही बघण्याची सवय केवळ एक तासांपुरतीच ठेवावी. ते म्हणाले की, जेव्हा तुम्हा जास्त वेळ एकाच जागी बसून टीव्ही बघता तेव्हा याने कोरोनरी हार्ट डिजीज होण्याचा धोका १६ टक्के वाढतो. असं तेव्हा होतं जेव्हा कोरोनरी आर्टरीजमध्ये फॅट जमा होतं. याने कोरोनरी आर्टरीज फार जास्त पातळ होऊ लागतात, ज्याने हार्ट ब्लड सप्लाय कमी होऊ लागतो.
अभ्यासक डॉ. यॉन्गवॉन्ग यांनी द गार्डियनला सांगितलं की, टीव्ही बघण्याचा वेळ कमी केल्याने कोरोनरी हार्ट डिजीजसहीत अनेक प्रकारच्या हार्ट संबंधी आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो. हा रिसर्च BMC Medicine जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात अभ्यासक म्हणाले की, त्यांनी ४० ते ६९ वयोगटातील जवळपास ३ लाख व्हाइट ब्रिटीश लोकांच्या डेटाचा वापर केला.
रिसर्चमध्ये सहभागी सगळ्या लोकांपैकी कुणालाही कोरोनरी हार्ट डिजीज किंवा स्ट्रोकची समस्या नव्हती. डेटाचं विश्लेषण केल्यानंतर अभ्यासकांनी सांगितलं की, जेव्हा तुम्ही फार जास्त टीव्ही बघता तेव्हा याने कोरोनरी हार्ट डिजीजचा धोका फार जास्त वाढतो. ते पुढे म्हणाले की, जर लोक आपल्या या स्क्रीन अॅडिक्शनला सोडू शकत नाही तर त्यांनी टीव्ही बघताना मधे मधे ब्रेक घ्यावा आणि स्ट्रेचिंग करावं.
सोबतच जे लोक टीव्हीसमोर तासंतास बसतात, त्यांनी यादरम्यान स्नॅक्ससारखे चिप्स किंवा चॉकलेटचं सेवन अजिबात करू नये.
काही वर्षांआधी यूनायटेड स्टेट्स गव्हर्नमेंट नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनकडून प्रकाशित एका ऑब्जर्वेशनल रिसर्चमध्ये सांगण्यात आलं होतं की, लोकांच्या टीव्ही बघण्याच्या सवयीमुळे त्यांच्यात हार्ट डिजीजचा धोका फार जास्त वाढू शकतो.
कोरोनरी हार्ट डिजीजचं सर्वात सामान्य लक्षण छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत. याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका फार जास्त वाढतो.