फक्त दहा मिनिटांच्या 'या' ऑफिस एक्सरसाइज स्ट्रेस दूर ठेवतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 05:27 PM2019-03-20T17:27:14+5:302019-03-20T17:28:36+5:30

सध्या वाढलेला कामाचा व्याप आणि स्पर्धेचं युग यांमुळे ऑफिसमध्ये सतत अनेक लोक एकाच जागी बसून राहतात. तासन्तास एकाच जागी बसणं शरीराच्या संरचनेसाठी ठिक नसतं.

Ten minutes of office exercise will save you from body stiffness | फक्त दहा मिनिटांच्या 'या' ऑफिस एक्सरसाइज स्ट्रेस दूर ठेवतील!

फक्त दहा मिनिटांच्या 'या' ऑफिस एक्सरसाइज स्ट्रेस दूर ठेवतील!

Next

(Image Credit : Prevention)

सध्या वाढलेला कामाचा व्याप आणि स्पर्धेचं युग यांमुळे ऑफिसमध्ये सतत अनेक लोक एकाच जागी बसून राहतात. तासन्तास एकाच जागी बसणं शरीराच्या संरचनेसाठी ठिक नसतं. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही शरीराची जेवढी हालचाल कराल तेवढचं तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल. पण कामाच्या व्यापामुळे आपली इच्छा नसतानाही तासन्तास एकाच जागी बसावं लागतं. त्यामुळे शरीरामध्ये स्टिफनेस येतो. त्यासाठी आवश्यक आहे की, बसल्या जागीच किंवा ऑफिसमध्येच थोडा वेळ काढून थोडासा व्यायाम करावा. त्याने शरीराची हालचाल होण्यास मदत होते. जाणून घेऊया यासाठी काही सोप्या वर्कआउट टिप्स.

सतत बसणं आरोग्यासाठी घातक 

बँक जॉब, डेस्क जॉब आणि इतर अनेक क्षेत्र ज्यांमध्ये आपल्याला अनेक तासांसाठी एकाच पोजिशनमध्ये बसावं लागेल. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो तसेच इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो. सतत बसून राहिल्याने हृदयरोग आणि डायबिटीज यांसारख्या अनेक आजारांचासामना करावा लागतो. 

स्ट्रेचिंग 

- काम करत असताना साधारणतः दर दोन तासांनी बसल्या जागीच उठून एक्सरसाइज करा. जर उठून जाणं शक्य नसल तर बसल्या बसल्याच एक्सरसाइज करा. यामुळे रक्तप्रवाह सुरू राहतो. 

- तळवे आणि टाचांचा व्यायाम करा. त्यासाठी तळवे किंवा टाचा क्लॉकवाइज आणि अॅन्टी- क्लॉकवाइज गोल-गोल फिरवा. 

- खुर्ची मागे करून पायांनाही स्ट्रेच करा. मसल्स स्ट्रेच करा. जेव्हा आपण चालतो, त्यावेळी रक्त वरच्या दिशेला पंप होतं. 

- मानेचाही व्यायाम करा. बसल्या-बसल्याच वरती पाहा आणि मान गोल-गोल फिरवा.

- दोन्ही हात वेस्ट लाइनवर ठेवून मागच्या दिशेला झुका. त्यामुले कंबरेचा व्यायाम होण्यास मदत होईल. 

- दोन्ही खांदे मागच्या दिशेला झुकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही बाजूंना एक-एक करून झुका. 

- दोन्ही हात उचलून खांद्यांवर ठेवा आणि कंबर फिरवा. यामुळे मसल्सचा व्यायाम होतो. 

- हातांची मुठ वळा आणि उघडा, गोल-गोल फिरवून बोटांना स्ट्रेच करा. 

फॉलो करा या टिप्स :

डेक्सटॉप आहे उत्तम

जर तुमच्याकडे पर्याय असेल तर लॅपटॉपऐवजी डेक्सटॉपची निवड करा. डेस्कटॉपची जागा फिक्स्ड असते. त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. 

स्क्रिन लेव्हलवर ठेवा

तुम्हाला काही तासांसाठी एकाच पोझिशनमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे गरजेचं आहे की, स्क्रिन लेव्हल आपल्या आयलेव्हलच्या बरोबर असावी. तसेच मान जास्त वरती करावी लागणार नाही याचीही काळजी घ्यावी. किबोर्ड टेबलवर ठेवण्याऐवजी किबोर्ड ट्रेमध्ये ठेवा. 

हातांना आराम द्या 

काम करताना कोपर आणि आर्म्सना रेस्ट द्या. यामुळे खांदे रिलॅक्स राहतात आणि त्यांच्यावर प्रेशर येत नाही. 

अंतर असणं गरजेचं 

तुम्ही दोन गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं ते म्हणजे, स्क्रिन डोळ्यांपासून लांब असेल तर उत्तम आहे. पण खुर्ची मात्र टेबलाच्या जवळ असणं गरजेचं असतं. हे तुमच्या डोळ्यांसोबतच हातांसाठीही फायेदशीर ठरतं. 

Web Title: Ten minutes of office exercise will save you from body stiffness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.