सफरचंद चमकदार दिसण्यासाठी लावले जाणारे वॅक्स 'असे' ओळखा, नाहीतर द्याल मृत्यूला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 04:16 PM2021-10-05T16:16:28+5:302021-10-05T16:23:19+5:30

भेसळीच्या प्रकारांमुळे सफरचंद चमकदार करण्यासाठी आजकाल त्यावर मेणाचा लेप केला जात आहे. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. सफरचंदा वर लावलेला मेणाचा लेप कसा ओळखावा आणि कसा काढायचा ते जाणून घेऊया.

test to know apple wax, how to know if there is wax on apple remedies to clean wax on apple | सफरचंद चमकदार दिसण्यासाठी लावले जाणारे वॅक्स 'असे' ओळखा, नाहीतर द्याल मृत्यूला निमंत्रण

सफरचंद चमकदार दिसण्यासाठी लावले जाणारे वॅक्स 'असे' ओळखा, नाहीतर द्याल मृत्यूला निमंत्रण

googlenewsNext

असे म्हटले जाते की दररोज एक सफरचंद सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण आहे 'An apple a day keeps the doctor away'. परंतू, भेसळीच्या प्रकारांमुळे सफरचंद चमकदार करण्यासाठी आजकाल त्यावर मेणाचा लेप केला जात आहे. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. सफरचंदा वर लावलेला मेणाचा लेप कसा ओळखावा आणि कसा काढायचा ते जाणून घेऊया.

सफरचंद अधिक काळ चमकदार आणि ताजे राहण्यासाठी मेणाचा लेप लावला जात आहे. सफरचंदावर तीन प्रकारचे कोटिंग लावले जाते जे बीजवॅक्स, कर्नाउबा वॅक्स आणि शेलॅक वॅक्स स्वरूपात असते.

वॅक्स कसे काढावे
सफरचंदवर केलेले वॅक्सिंग काढण्यासाठी सर्वप्रथम कोमट पाणी घ्या आणि त्यात मीठ घाला. त्यानंतर त्यात सफरचंद टाका. २ मिनिटे ठेवा आणि नंतर बाहेर काढा. नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून पुसून टाका.

बेकिंग सोडा खाण्यापासून ते इतर लाइफ हॅक्स पर्यंत प्रत्येक गोष्टीत खूप उपयुक्त आहे. वॅक्स काढून टाकण्यासाठी, एक लिटर पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालून एक द्रावण तयार करा. सफरचंद या पाण्यात ५ मिनिटे सोडा. स्वच्छ पाण्याने धुवून पुसून टाका.

सर्वात सोपा मार्ग म्हणजे लिंबाच्या पाण्यात रुमाल टाकून सफरचंद पुसून टाका. लक्षात ठेवा रुमाल स्वच्छ असावा.

व्हिनेगरच्या मदतीनेही वॅक्स काढले जाऊ शकते. यासाठी, एक लिटर पाणी घ्या आणि त्यात २ चमचे व्हिनेगर घाला. पाणी चांगले मिसळा आणि त्यात सफरचंद २ ते ३ मिनिटे ठेवा. यानंतर, सफरचंद पाण्यामधून काढून टाका आणि स्वच्छ कापडाने सफरचंद पुसून टाका.

तर अशा प्रकारे तुम्ही घरच्याघरी सफरचंदावरील वॅक्स काढू शकता. तसेच, सफरचंद खरेदी करताना शंका असल्यास, त्यांना नखे ​​किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने घासून घ्या. जर मेण असेल तर पांढरा थर दिसून येईल.

Web Title: test to know apple wax, how to know if there is wax on apple remedies to clean wax on apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.