लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाचा धोका उद्भवणार? जाणून घ्या लसीबाबत महत्वाच्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 11:49 AM2021-01-08T11:49:54+5:302021-01-08T11:58:20+5:30
CoronaVaccine News & latest Updates : या संपूर्ण प्रक्रियेत विषाणू कमकुवत होईल आणि तो शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला कोणताही धोका पोहोचवू शकणार नाही. यामुळं पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही.
कोरोना लसीची संपूर्ण जगभरातील लोक प्रतिक्षा करत आहेत. कोरोनाची लस तयार झाल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला मिळणार किंवा आपल्यापर्यंत लस कधी पोहोचणार असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. एकदा लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्गाची भीती असणार का? असा प्रश्न सगळ्यानाच पडत आहे. लस टोचल्यानंतर शरीरात काय काय होतं, त्याचे कसे परिणाम होतात याबाबत न्यूयॉर्क टाईम्समध्ये वैज्ञानिकांनी अधिक माहिती दिली आहे.
लस घेतल्यानंतर नक्की काय होतं?
इंजेक्शनद्वारे ही लस शरीरात टोचली जाते. शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि शरीरातील रोग प्रतिकारक पेशी अधिक चांगल्या पद्धतीनं आपलं काम करू लागतात. रोग प्रतिकारक यंत्रणा मजबूत केल्यानंतर ही लस स्पाईक प्रोटीन ओळखून त्याविरुद्ध वेगानं काम सुरू करते आणि या व्हायरसला पेशींमध्ये पोहोचण्यापासून रोखते. त्याचवेळी पेशी अँटीबॉडीज बनवून पॅथोजनला रोखण्याचं काम करतील. या संपूर्ण प्रक्रियेत विषाणू कमकुवत होईल आणि तो शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला कोणताही धोका पोहोचवू शकणार नाही. यामुळं पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही.
एंटीबॉडीज कशा तयार होतात
लस शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि त्या पेशी व्हायरसविरुद्ध लढा देतात. विषाणूच्या स्पाईक प्रोटीनवर हल्ला करतात. त्याचवेळी बी पेशी अँटीबॉडीज तयार करू लागतात. त्यामुळे शरीरात असलेला विषाणू काही करू शकत नाही, कारण आता शरीर त्याचा सामना करण्यास सज्ज झालेलं आहे.
लसी सुरक्षित आहे का?
लस शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना सक्रीय करते आणि त्या पेशी व्हायरसविरुद्ध लढण्यास तयार होतात. व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनवर हल्ला करतात. त्याचवेळी बी पेशी अँटीबॉडीज तयार करू लागतात. त्यामुळे शरीरात असलेला विषाणू आक्रमण करू शकत नाही, कारण आता शरीर त्याचा सामना करण्यास तयार झालेलं आहे.
४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स
लसीचे दोन डोस घेणं गरजेचं
कोरोना लशीचे दोन डोस घेणं आवश्यक आहेत. २८ दिवस म्हणजे साधारण महिन्याभराच्या अंतरानं दिले जातात. पहिला डोस शरीराला विषाणू विरुद्ध लढण्यासाठी तयार करतो, तर दुसरा डोस त्याला आणखी मजबूत करतो. त्यामुळे पहिला डोस दिल्यानंतरही मास्क लावणं आणि सुरक्षित शारीरिक अंतर राखणं महत्त्वाचं आहे. दोन डोस घेतल्यानंतर याचा अधिक प्रभाव पडतो. 'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती