आता हार्ट बीटने ओळखता येणार कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही? ;जाणून घ्या कसं ते
By manali.bagul | Published: January 8, 2021 12:53 PM2021-01-08T12:53:48+5:302021-01-08T13:09:11+5:30
CoronaVirus News & Latetst Updates : हा अभ्यास 'कोविड-19 सिम्पटम्स स्टडी एप' द्वारे कोविडची लक्षणं असलेल्या ४० लाखांपेक्षा जास्त लोकांच्या माहितीच्या आधारे करण्यात आला होता.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या चाचणीबाबत वैज्ञानिकांनी एक दावा केला आहे. नवीन रिपोर्ट्नुसार माणसाच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये झालेला बदल कोरोना संक्रमित असल्याची सुचना देतो. म्हणजेच जर तुमच्या शरीरात असामान्य हार्ट बीट येत असतील तर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असू शकता. हा अभ्यास 'कोविड-19 सिम्पटम्स स्टडी एप' द्वारे कोविडची लक्षणं असलेल्या ४० लाखांपेक्षा जास्त लोकांच्या माहितीच्या आधारे करण्यात आला होता.
या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार हृदयाचे ठोके ज्या गतीने संकेत देतात. यावरून कोरोनाचं संक्रमण झालं की नाही हे ओळखता येऊ शकतं. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ मध्ये हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. यामध्ये माणसांचे हार्ट बिट्स १०० प्रति मिनिटांपेक्षा जास्त होऊ शकतात.
हार्ट बीटने कोरोना संसर्ग ओळखण्यापूर्वी कमीतकमी पाच मिनिटे विश्रांती घ्या. यानंतर, बोटाने आपला नाडी दर तपासा. या दरम्यान, मनगट शिरा किंवा गळ्याजवळ हलकेच 'वाईंड पाईप' दाबा.
30 सेकंदांपर्यंत हृदयाची ठोके मोजा आणि नंतर त्यास 2 ने गुणाकार करा. आपल्या हार्ट बिट रेट समोर येईल.
तज्ञ म्हणतात की पल्स बीट रेग्यूलर रिदम सामान्य आहे. जर आपल्या हृदयाची गती प्रति मिनिट 60 ते 100 बीट्स असेल तर सर्व सामान्य आहे. परंतु जर हृदय गती 100 च्या वर जात असेल तर काही समस्या उद्भवू शकते. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचे पहिल्यांदा लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ब्रिटनमध्ये कोरोनाचं रूप सापडल्यानं व्हायरसच्या प्रसाराचे केंद्र बनले आहे. यामुळे संपूर्ण हाहाकार निर्माण झाला आहे. ४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स
अशा स्थितीत सरकार आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
नवीन स्ट्रेन आल्यानं दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीही दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. देशात मृतांच्या वाढत्या संख्येमुळे शवपेटींची कमतरता आहे. डेली मेलच्या अहवालानुसार येथील कोरोनामुळे होत असलेल्या या मृत्यूचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत १२० टक्क्यांनी वाढले आहे. बुधवारी देशात ४२२ लोकांचा मृत्यू झाला तर १५ हजाराहून अधिक लोक संसर्गित झाले. 'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती