पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता ठरू शकते गंभीर आजारांचं कारण, जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:45 PM2020-04-30T12:45:37+5:302020-04-30T17:57:28+5:30
बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात सुद्धा मुलांना आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
टेस्टोस्टोरॉन पुरुषांच्या शरीरातील एक महत्वाचा हार्मेन आहे. टेस्टोस्टोरॉनमुळे पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढते. पण या हार्मोनचा शरीरातील स्तर कमी झाल्यामुळे डायबिटीस, हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, थकवा येणं सांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसजसं वय वाढतं जातं तसतसं टेस्टोस्टोरॉनचा शरीरातील स्तर कमी होत जातो. सध्याच्या अनियमीत खाण्यापिण्याच्या वेळा, बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात सुद्धा मुलांना आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
टेस्टोस्टेरॉन पुरुषांमधील एड्रेनल ग्लँडमार्फत तयार होत असतो. टेस्टोस्टोरॉन हार्मोन्सचा स्तर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी असतो. टेस्टोस्टेरॉनचा स्तर यौनक्रिया, मासपेशी आणि केसांची वाढ यांच्याशी संबंधीत असतो. पुरूषांमध्ये ४० वयानंतर या हार्मोनचा स्तर कमी होण्यास सुरूवात होते. शरीरात टेस्टोस्टोरॉनच्या कमतरतेमुळे अशी लक्षणं दिसतात.
टेस्टोस्टोरॉनच्या कमतरतेमुळे मासपेशी आणि हाडं कमजोर होता. त्यामुळे हाडांमध्ये तीव्र वेदना होण्याची शक्यता असते.या हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला लवकर थकवा येण्याची अशक्तपणा येण्याची शक्यता असते. याशिवाय ताण- तणाव वाढतो. सतत चिडचिड होते. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे लैगिंक क्षमता कमी होऊन लैगिंक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोनमध्ये कमतरता येते. काही शोधातून असे समोर आले आहे की, नशा करणाऱ्या पुरुषांचं शरीर केवळ ५० टक्केच टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करतं. काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी व्यवस्थित ठेवू शकता.
संतुलित आहार घ्या. यासाठी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये अंडी, हिरव्या भाज्या आणि शेंगदाणे खाऊ शकता. कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांमुळे टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो.त्यांनी आहारात झिंक आणि मॅग्नेशिअमसारखे खनिज मिळतील अशा पदार्थांचा समावेश करावा. ( हे पण वाचा-रोजच्या डासांनी हैराण असाल, तर 'या' उपायांनी त्वचेचं होणारं नुकसान टाळा)
नियमित व्यायाम करावा. व्यायाम केल्याने संपूर्ण शरीराची लवचीकता वाढते. तसंच दीर्घकाळपर्यंत तुम्ही तरूण दिसू शकता. कारण व्यायामामुळे कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. तसंच गोड पदार्थ कमी खावे. कारण याने शरीरात शुगरचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेच शरीरात इन्सुलिनचं प्रमाणही वाढतं. जेव्हा गोड काही खाल्लं जातं. तेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आपोआप कमी होतं. त्यामुळे गोड पदार्थ कमी खावे. ( हे पण वाचा-CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी १० मिनिटं ऊन अंगावर घेणं गरजेचं, तज्ञांचा दावा)