कामाच्या ओझ्याने पुरुषांच्या शुक्राणूंचा DNA बदलतोय! गर्भपाताला पुरुष जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:30 AM2023-02-20T10:30:37+5:302023-02-20T10:30:48+5:30
खराब शुक्राणू डीएनएमुळे जन्माला येणाऱ्या बाळातही अनेक प्रकारचे आजार
मुंबई : ऑफिसमध्ये कामाचा सतत ताण, घरामध्ये आर्थिक समस्या आणि रोजची अनियमित दिनचर्या यामुळे पुरुषांच्या डीएनएमध्ये सातत्याने बदल होत असून, यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्येही अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत.
डीएनए सतत बदलण्यास शुक्राणू फ्रेगमेंटेशनही म्हटले जाते. यामुळे महिलांना गर्भधारणा करण्यास कठीण होते. मॅन अँड मिसकॅरेजच्या अहवालात म्हटले आहे की, महिलांमध्ये सतत गर्भपात होण्यास अधिक प्रमाणात पुरुष जबाबदार आहेत. पुरुषांमध्ये ही स्थिती सतत तणावात राहिल्यामुळे निर्माण होते. गर्भधारणेशी संबंधित ५० टक्के प्रकरणांमध्ये हेच कारण प्रमुख आहे. प्रत्येक सहापैकी एक गर्भपात हा पुरुषाच्या खराब शुक्राणूच्या कारणामुळे होत आहे.
वेगाने वाढतोय ताण
सध्या कामाच्या ओझ्यामुळे तरुण अतिशय तणावात आहे. यामुळे ते धूम्रपान आणि मद्यपान करतात. यामुळे ताण आणखी वाढतो. ताण वाढला की शुक्राणूमध्ये अँटिऑक्सिडंट्सचा स्तर कमी होण्यास सुरुवात होते. खराब शुक्राणूमुळे पुरुषांच्या मूल जन्माला घालण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्यासह जन्माला येणाऱ्या बाळात अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याची गरज आहे.
काय करावे?
ताणापासून वाचवण्यासाठी पुरुषांनी पुरेशा आराम करावा.
जीवनशैलीमध्ये बदल करावा
योगासने करावीत
आरोग्यदायी आहार घ्यावा
ध्रूमपान करू नये
धूम्रपानामुळे गर्भपाताची शक्यता ५० टक्क्यांनी वाढते
डीएनए फ्रेगमेंटेशन - जोडप्यांनाही आता मिळेल मुलांचे सुख
अभ्यासाचे मुख्य संशोधक डॉ. चेना जयसेना यांनी म्हटले की, आता शुक्राणू फ्रेगमेंटेशन टेस्टमुळे पुरुषांमध्ये नपुंसकतावर उपचार करणे शक्य होणार आहे. जोडप्यांना मुलांचे सुख मिळणे शक्य होणार आहे.