सकाळच्या 'या' चुकांमुळे लिव्हर होतं खराब, दुर्लक्ष कराल तर पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:51 PM2024-09-18T13:51:56+5:302024-09-18T14:09:17+5:30
Morning Mistakes Can Damage Liver : लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि रक्तही शुद्ध केलं जातं. मात्र, जर सकाळी आपण काही चुका नियमितपणे केल्या तर लिव्हरसाठी त्या नुकसानकारक ठरू शकतात.
Morning Mistakes Can Damage Liver : लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी लिव्हरची महत्वाची भूमिका असते. लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि रक्तही शुद्ध केलं जातं. मात्र, जर सकाळी आपण काही चुका नियमितपणे केल्या तर लिव्हरसाठी त्या नुकसानकारक ठरू शकतात.
आपल्याद्वारे सकाळी केल्या गेलेल्या काही चुकांमुळे लिव्हरचं नुकसान होतं आणि लिव्हर खराब झाल्यावर डायबिटीस, सिरोसिस, लिव्हल फेल अशा समस्यांचा धोका वाढू शकतो. अशाच काही चुकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे.
१) झोपेतून उठल्यावर पाणी न पिणे
सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणं फार महत्वाचं असतं. पण बरेच लोक या सवयीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे लिव्हरचं नुकसान होतं. रात्रभर झोपल्यानंतर शरीर डिहायड्रेशन होतं आणि सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्याल तर शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. जर तुम्ही पाणी न पिता दिवसाची सुरूवात करत असाल तर याचा थेट प्रभाव लिव्हरच्या आरोग्यावर पडतो.
२) सकाळी तेलकट आणि फॅट असलेले फूड्स खाणं
बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्ये तळलेले आणि भाजलेले किंवा फॅट भरपूर असलेले पदार्थ खातात. तेलकट आणि फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने पचन तंत्राचं नुकसान तर होतंच, सोबतच लिव्हरही याने प्रभावित होतं. फॅटी फूडमुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होतं, ज्यामुळे फॅटी लिव्हर डिजीजचा धोका वाढतो. यामुळे लिव्हच्या कामात अडथळा निर्माण होतो. तसेच याकडे जास्त काळ दुर्लक्ष केलं तर डायबिटीससारखा आजारही होऊ शकतो.
३) एक्सरसाईज न करणे
सकाळी थोडा वेळ एक्सरसाईज केल्याने शरीर तर चांगलं राहतंच सोबतच लिव्हरसाठीही फायदेशीर ठरतं. एक्सरसाईज केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि लिव्हरच्या कामात सुधारणा होते. जे लोक दिवसभर बसून काम करतात आणि सकाळी व्यायाम करत नाही त्यांच्या लिव्हरवर नकारात्मक प्रभाव पडतो. पुढे लिव्हर हळूहळू कमजोर होऊ लागतं आणि नंतर अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
४) रात्रीचं शिल्लक राहिलेलं सकाळी खाणं
बरेच लोक रात्री शिल्लक राहिलेलं अन्न सकाळी खातात. पण असं करणं लिव्हरसाठी नुकसानकारक ठरू शकतं. शिळ्या अन्नामुळे लिव्हरवर अतिरिक्त दबाव पडतो. कारण यातील बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिव्हरवर जास्त दबाव पडतो. यामुळे लिव्हरची कार्यक्षमता कमजोर होऊ शकते.
५) सकाळी धुम्रपान किंवा अल्कोहोलचं सेवन
बऱ्याच लोकांना सकाळी सिगारेट आणि मद्यसेवन करण्याची सवय असते. मात्र, असं केल्याने लिव्हरचं सगळ्यात जास्त नुकसान होतं. धुम्रपान आणि दारूमुळे लिव्हरच्या सेल्स डॅमेज होतात. ज्यामुळे लिव्हरचं काम बिघडतं. जर वेळीच ही सवय मोडली नाही तर लिव्हर सिरोसिर किंवा कॅन्सरचा धोका वाढतो.