शहरात टक्कल असणाऱ्यांची संख्या वाढली; केसांना बाजारात आला सोन्याचा भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 01:29 PM2022-09-01T13:29:20+5:302022-09-01T13:29:30+5:30
सध्या केसांना बाजारात सोन्याचा म्हणजेच ४ हजार ५०० ते ५००० रुपये प्रतिकिलोपर्यंत मागणी आहे.
गडचिरोली- मानवी शरीराचा कोणताही अवयव वाया जात नाही. त्याचा उपयोग कसा करायचा, हे वापरकर्त्यावर अवलंबून असते. शरीराची शान वाढविणारे केस जेवढे डोक्यावर शोभून दिसतात तेवढेच ते गळल्यानंतरही उपयोगी ठरतात. सध्या केसांना बाजारात सोन्याचा म्हणजेच ४ हजार ५०० ते ५००० रुपये प्रतिकिलोपर्यंत मागणी आहे.
८० सलून व्यावसायिक शहरात-
गडचिराेली शहरात जवळपास ८० सलून व्यावसायिक आहेत. शहरातील वेगवेगळ्या वाॅर्डात त्यांनी व्यवसाय थाटला आहे.
₹५००० किलो केसाला भाव-
गडचिराेली जिल्ह्यात केसांना जवळपास ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये प्रतिकिलाे भाव आहे. याहून अधिक भाव असू शकताे.
टक्कल असणारे वाढले-
प्रदूषण, त्वचा राेग, चिंता यासह विविध कारणांमुळे डाेक्यावरील केस गळतात. केस गळण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये सर्वाधिक असून, शहरात टक्कल असलेल्या लाेकांची संख्या बरीच आहे.
विगची मागणी वाढली-
टक्कल पडलेले व्यक्ती विगचा वापर करतात. शहरी भागात याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात मात्र विग वापरणारे कमीच.
ग्राहकांचे डाेक्यावरील केस कापल्यानंतर आम्ही त्याची याेग्य विल्हेवाट लावताे. कारण हे केस आखूड असतात. लांब केस असल्यास त्याचा उपयाेग विक्रीसाठी हाेताे; परंतु लांब केस असणारे ग्राहक कमीच येतात. - त्रिदेव जांभुळे, सलून व्यावसायिक
आमच्या सलूनमध्ये पुरुषच येतात. तेही वेगवेगळ्या प्रकारची कटिंग करतात. अधिक केस वाढू देण्याची प्रतीक्षा ते करीत नाहीत. - भूषण लांजेवार, सलून व्यावसायिक