सावधान! ‘ब्रेन ट्यूमर’चा धोका महिलांना जास्त, ७१ टक्के ट्यूमर सौम्य; जाणून घ्या, लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:27 PM2022-06-08T15:27:26+5:302022-06-08T15:29:14+5:30

ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते.

The risk of brain tumors is higher in women Know the symptoms | सावधान! ‘ब्रेन ट्यूमर’चा धोका महिलांना जास्त, ७१ टक्के ट्यूमर सौम्य; जाणून घ्या, लक्षणं

सावधान! ‘ब्रेन ट्यूमर’चा धोका महिलांना जास्त, ७१ टक्के ट्यूमर सौम्य; जाणून घ्या, लक्षणं

googlenewsNext

- सुमेध वाघमारे 

मेंदू आपल्या शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवतो. परंतु ट्यूमरमुळे त्यात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे लक्षणे दिसताच उपचार आवश्यक आहे. प्राथमिक ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते. महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. ८ जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिन म्हणून पाळला जातो. 

असा समजून घ्या, ब्रेन ट्यूमर

ट्यूमर म्हणजे मेंदूच्या ऊतींमधील असामान्य पेशींची वाढ. यामुळे दृष्टी, बोलणे, हालचाल, विचार व भावना यात अडथळे येऊ शकतात. ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात होऊ शकतो. ४% प्रकरणे ट्यूमरच्या सर्व प्रकरणांपैकी  ० ते १४ वयोगटातील मुलांमध्ये आढळतासर्व ब्रेन ट्यूमरपैकी सुमारे ७१ टक्के ट्यूमर सौम्य असतात. ७५.७% ब्रेन ट्यूमर रुग्णांसाठी सरासरी जगण्याचा दर असतो.

ब्रेन ट्यूमरचे प्रकार 

सौम्य ट्यूमर - यात आक्रमक कर्करोगाच्या पेशी नसतात. बहुतेक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर परत वाढत नाहीत.
घातक ट्यूमर - कर्करोगाच्या पेशी असतात. त्या जवळच्या ऊतींमध्ये पसरतात आणि उपचारानंतर पुन्हा वाढू शकतात.
प्राथमिक ट्यूमर - मेंदूच्या पेशींमध्ये गाठ होण्यास सुरुवात होते. हे मेंदूच्या किंवा मणक्याच्या इतर भागांमध्ये पसरू शकते.
मेटास्टॅटिक किंवा दुय्यम ट्यूमर- हा घातक असतो. शरीराच्या दुसऱ्या भागातून आलेल्या कर्करोगाच्या पेशींपासून वाढतो.

लक्षणे 

ब्रेन ट्यूमरची लक्षणे त्याचे स्थान, आकार, वाढीचा दर व अवस्था यावर अवलंबून असतात.
-डोकेदुखी, चालणे, बोलणे किंवा विचार करणे कठीण होणे
- अशक्तपणा 
- चक्कर येणे
- असामान्य हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे
- दृष्टी समस्या निर्माण होणे
- उलट्या होणे

उपचार पद्धती 

शस्त्रक्रिया - ट्यूमर शस्त्रक्रियेने काढतात.
रेडिएशन थेरपी - रेडिएशनचा उच्च डोस कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यास वापरला जातो.
केमोथेरपी - कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी शक्तिशाली रसायने वापरतात.
लक्ष्यित थेरपी ट्यूमर विरोधी औषधे.

महिलांमध्ये ५८ टक्के प्रमाण 

ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण महिलांमध्ये ५८ टक्के, तर पुरुषांमध्ये ४२ टक्के आहे. मेंदूत ट्यूमरचे निदान होणे घातक ठरू शकते आणि रुग्णाचे आयुष्य बदलू शकते.
- डॉ. पलक जयस्वाल, न्युरोसर्जन, नागपूर
 

Web Title: The risk of brain tumors is higher in women Know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.