लिव्हर खराब होत असल्यावर हात आणि पायांवर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:28 AM2024-07-03T09:28:55+5:302024-07-03T09:29:58+5:30

Damage liver symptoms: सुरूवातीला फॅटी लिव्हरची समस्या झाल्याची लक्षणं दिसत नाहीत. ज्यामुळे वेळीच सावध झाले नाही तर लिव्हर अधिक खराब होऊन समस्या गंभीर होऊ शकते.

The symptoms that appear on the hands and feet when the liver is damaged | लिव्हर खराब होत असल्यावर हात आणि पायांवर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच व्हा सावध!

लिव्हर खराब होत असल्यावर हात आणि पायांवर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच व्हा सावध!

Damage liver symptoms: हे सगळ्यांनाच माहीत आहे की, लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीरातील अनेक महत्वाची कामे लिव्हर द्वारे केली जाते. जर लिव्हरमध्ये काही गडबड झाली तर शरीरावर वेगवेगळी लक्षण दिसू लागतात. फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. यात व्यक्तीच्या लिव्हरवर फॅट जमा होतं. सुरूवातीला फॅटी लिव्हरची समस्या झाल्याची लक्षणं दिसत नाहीत. ज्यामुळे वेळीच सावध झाले नाही तर लिव्हर अधिक खराब होऊन समस्या गंभीर होऊ शकते.

लिव्हर खराब होत असल्याची लक्षण

- फॅटी लिव्हरवर उपचार करण्यास तुम्ही जेवढा जास्त वेळ लावाल. लिव्हर तेवढं जास्तू सूजत जातं. पुढे जाऊन यामुळे सिरोसिसची समस्या होऊ शकते. सिरोसिसचीही लक्षणही खूप उशीरा समोर येतात.

- पसरलेल्या रक्तवाहिन्यामुळे तळहातांवर लालसरपणा दिसू शकतो. जसजसा लिव्हरला काम करण्यात जास्त संघर्ष करावा लागतो, तुमची नखे पांढरी होऊ लागतात. खासकरून अंगठा आणि करंगळीची नखे.

- बोटं सामान्यापेक्षा जास्त पसरतात आणि गोल होतात. असं होण्याचं कारण म्हणजे ऑक्सिजन नेणाऱ्या रक्तवाहिन्या योग्यपणे काम करू शकत नाहीत.

आणखीही काही लक्षण

सतत थकवा जाणवणे

सहजपणे जखम होणे

भूक कमी लागणे

मळमळ

पाय आणि टाचांवर सूज येणे

अचानक वजन कमी होणे

त्वचेवर खाज येणे

काविळ होणे

पोटात तरल पदार्थ जमा होणे

त्वचेवर जाळ्यासारख्या रक्तवाहिन्या दिसणे

Web Title: The symptoms that appear on the hands and feet when the liver is damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.