कायम हडेलहप्पी केलीत, तर आयुष्य होईल वैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:53 PM2017-10-24T15:53:55+5:302017-10-24T15:54:44+5:30

‘मी म्हणेल ती पूर्व, माझ्या मनासारखंच व्हायला हवं.. असा टोकाचा आग्रह करतो आयुष्याची धुळधाण..

..Then your life will become barren | कायम हडेलहप्पी केलीत, तर आयुष्य होईल वैराण

कायम हडेलहप्पी केलीत, तर आयुष्य होईल वैराण

googlenewsNext
ठळक मुद्देटोकाचे आग्रह थांबवा.मी म्हणेल तसंच व्हावं.. अशी वृत्ती आपल्याबरोबर इतरांनाही त्रासदायक.नकारात्मक विचारसरणी वाढीस लागते.

- मयूर पठाडे

प्रत्येकानं आपल्या मनासारखं वागावं असं आपल्याला वाटतं. ‘आपल्या’ मनासारखं म्हणजे ‘माझ्या’ मनासारखं ! तसं ती व्यक्ती वागली नाही की मग आपल्याला राग येतो, संताप होतो, चिडचिड होते. अख्खा दिवस खराब जातो.. का होतं असं? कारण आपल्या म्हणून प्रत्येकाच्या काही धारणा असतात. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणेच व्हाव्यात अशी साहजिकच प्रत्येकाची इच्छा असते. तशा त्या झाल्या नाहीत की मग आपलं सगळंच बिघडतं.. आणि मग सगळंच बिघडत जातं..
संशोधकांनी सांगितलंय, आपल्या इच्छांचं जे भूत आपल्या मागे लागलेलं असतं ना, तेच सगळा घोळ करतं. त्या अपेक्षांच्या भूताला त्यामुळे आपल्यासोबत वागवू नका. आपल्यापासून त्याला थोडं दूरच ठेवा. कारण अपेक्षांचं हे भूत एकदा का आपल्या मानगुटीवर बसलं की मग ते कोणालाच सोडत नाही. आपल्याला तर नाहीच नाही, पण आपण ज्यांच्या संपर्कात अ्रसतो, त्यांनाही मग हे भूत छळतं.
अमेरिकेतील काही मानसशास्त्रज्ञांनी यावर व्यापक अभ्यास केला.. त्याचं निरीक्षण असं.. जी लोकं टोकाची आग्रही असतात, त्यांच्याबाबतीत बºयाचदा हा प्रकार होतो. अमूक गोष्टी अशी म्हणजे अशीच हवी.. असं त्यांचं धोरण असतं. त्यामुळे त्यांना स्वत:ला तर त्याचा त्रास होतोच, कारण त्यांच्यासारखं, अगदी तसंच इतर कोणाला ते करता येत नाही. कसं येणार? कारण त्या दुसºया व्यक्तीनं ती गोष्ट कितीही चांगली केली, तरी त्यानं त्याचं समाधान होत नाही. त्यामुळे आपल्या मनासारखी एखादी गोष्ट करायची तर ती त्याला स्वत:लाच करावी लागते. एकटा माणूस किती गोष्टी स्वत:च करणार? काही गोष्टी त्याला इतरांवर सोपवाव्याच लागतात. पण या अतिरेकी अट्टहासामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो.
मानसशास्त्रज्ञ सांगतात, अशा व्यक्तींमुळे सारं वातावरणच बिघडतं. साºया वातावरणातच एक प्रकारची निगेटिव्हिटी, नकारात्मकता निर्माण होते. ही निगेटिव्ह एनर्जी मग साºयाच गोष्टी खराब करून टाकते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा टोकाचा आग्रह सोडा आणि साकल्यानं तिचा विचार करा. या दुषित वातावरणात मग कोणतीच गोष्ट चांगली होत नाही आणि सकारात्मक विचार करणारेही या निगेटिव्ह एनर्जीकडे ओढले जातात. कोणतीही गोष्ट उत्तमच व्हायला हवी, असा आग्रह जरूर हवा, त्यासाठी प्रयत्नही आवश्य करायला हवेत, पण किती ताणावं, कुठल्या टोकाला जावं यालाही मर्यादा असावी. नाहीतर मग अशा लोकांचं आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या साºया लोकांचं आयुष्यच नकारात्मक होऊन जातं. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल, तर टोकाचे आग्रह थांबवा.. इतरांवर विश्वास टाकायला आणि विश्वास द्यायला शिका.. अनेक गोष्टी मार्गी लागतील..
बघा, शास्त्रज्ञांचा हा सल्ला आपल्याला मानवतो का?

Web Title: ..Then your life will become barren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.