केळी खाल्ल्याने तोटेही होतात भरपूर; पाहा एकदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:25 PM2021-05-13T20:25:30+5:302021-05-13T20:26:44+5:30
केळ्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. पण जसे केळ्याचे फायदे आहेत तसे तोटेही मोठ्याप्रमाणावर आहेत बरं का...
केळ्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. जे जीमला जातात त्यांच्यासाठी केळं म्हणजे वरदान आहे. सर्वच वयोगटातील लोकांना केळी आवडतात. केळ्याचे फायदेही खूप आहेत. जसेकी, केळ्यामुळे फारच कमी कालावधीत उर्जा मिळते. केळ्यात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे केळ्यात रोगप्रतिकारक शक्तीही असते. तसेच यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी ६ आणि कॉपर यासारखे गुणधर्म असतात. तसेच केळयात अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे तुम्ही बऱ्याच रोगांपासून दूर राहता. केळं शक्तीवर्धक तर असतेच त्याचबरोबर केळ्यात रक्तातील शर्करा प्रमाणात ठेवण्याचाही गुणधर्म आहे.
हे सर्व केळ्याचे फायदे असले तरी केळ्याचे तोटेही आहेत. कोणते? वाचा खाली
मायग्रेन होण्याची शक्यता
केळ्यात टायरामाईन नामक तत्व असते. ज्यामुळे तुम्हाला मायग्रेन होण्याची शक्यता असते. केवळ नुसतं केळचं नाही तर केळ्याचे इतरही पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ले तरीही तुम्हाला मायग्रेनची समस्या होऊ शकते.
वजन वाढणे
केळ्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. ज्यांचे वजन कमी असते अशा व्यक्ती वजन वाढवण्यासाठी केळं खातात. मध्यम आकाराच्या केळ्यात १०५ ते ११० इतक्या कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही केळ्याचे अतिसेवन करत असाल तर केळं तुमच्यासाठी वजन वाढण्याचं एक कारणं ठरू शकतं. त्यामुळे दिवसातून १ ते २ केळी खा.
हाइपरकलेमियाचा त्रास होण्याची शक्यता
केळ्यामध्ये पोटॅशिअम फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हायपरकलेमिया होण्याचा धोका असतो. रिसर्चने सिद्ध केलं आहे की तुमच्या शरीरात जर १८ ग्रॅंमपेक्षा जास्त केळे असले तर तुम्हाला हायपरकलेमियाची समस्या जाणवू शकते. केळं जास्त खाल्ल्यास शरीरातील पोटॅशिअम वाढल्याने हृदयाचे ठोके वाढणे, पल्स रेट वाढणे इत्यादी त्रास जाणवू शकतात.
जास्त झोप येणे
केळ्याचे जास्त सेवन केल्याने झोपेचे प्रमाण वाढू शकते. केळ्यामुळे मेंदुला आराम मिळतो. तुमचं शरीर शांत होतं. त्यामुळे तुम्हाला सतत झोप येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही काम करताना केळ खाणं टाळा.
त्यातल्या त्यात डाग असलेली केळी अधिक फायदेशीर असतात
अॅसिडीटीचा त्रास कमी होतो
जर तुम्ही डागाळलेली केळी खाल्ली तर अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. अॅसिडीटी झाल्यावर करपट ढेकर येतात. त्यामुळे अॅसिडीटीपासून सुटका हवी असेल तर डाग असलेलं केळं जरुर खा.
ताण तणाव कमी होतो
डाग असलेल्या केळ्यांमध्ये ताणतणाव कमी करण्याचे गुण असतात. त्यामुळे तुमचा मुड चांगला राहतो आणि मानसिक ताणतणावही कमी होतात.