उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:28 PM2021-05-24T20:28:23+5:302021-05-24T20:44:05+5:30

उन्हाळ्यात सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात.

There are many benefits to eating grapes in the summer; benefits are much more | उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

googlenewsNext

प्रत्येक ऋतूत फळे खाणे फायदेशीर असते. बदलत्या  ऋतुंप्रमाणे अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषत: उन्हाळ्यात फळे आपल्याला हायड्रेटेड तसेच ताजेतवाने ठेवतात. या काळामध्ये सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात. द्राक्षात फायबर, प्रथिने, लोह, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन सी, ए, के आणि बी इत्यादी घटक असतात. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहितच असेल. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि लोह असते. ही पोषकतत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे द्राक्षाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.

रक्तदाब नियंत्रणात राहतो 
द्राक्ष खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाणे फायद्याचे आहे.

अनेक रोगांवर उपाय 
प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये द्राक्ष खाणे फायद्याचे आहे. द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 

थकवा दूर होतो
द्राक्षामध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे असतात. हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामुळे थकवा दूर होतो.

हृदयरोगाशी संबधित समस्या दूर ठेवते
हृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही संशोधनातून असेही समोर आले आहे की, स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे.

रक्ताची कमतरता दूर करते
द्राक्षात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यावे.

माइग्रेनच्या समस्या कमी होतात 
सद्य काळात आपल्या जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे माइग्रेनच्या समस्येत वाढ झालेली आहे. आपल्यालाही मायग्रेनची समस्या असल्यास, आपण त्वरित द्राक्षे खाण्यास सुरवात केली पाहिजे. द्राक्षाचा रस पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही दिवस तुम्ही द्राक्षाचा रस घेतल्यास तुम्हाला मायग्रेनच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळू शकेल.

डोळ्यांसाठी फायदेशीर
द्राक्षातील पॉलीफेनोल्स आणि रेझेवॅटरॉल डोळ्यांच्या समस्या दूर करते. यात मॅक्युलर डीजनरेसन, ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ आणि मोतीबिंदू इत्यादी डोळ्यांच्या समस्या दूर राहतात.
 

Web Title: There are many benefits to eating grapes in the summer; benefits are much more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.