हाडं कमकूवत होण्याची 'ही' आहेत गंभीर कारणं, दररोजच्या 'या' सवयीच जबाबदार...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 04:36 PM2021-06-10T16:36:49+5:302021-06-10T16:37:43+5:30
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. जाणून घेऊया कोणत्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या सोडून दिल्याने आपली हाडं अधिक मजबूत राहु शकतात..
तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुमच्या इतर गोष्टींसोबत हाडंही मजबूत असणं फार महत्त्वाचं असतं. जर तुमची हाडं कमकुवत असतील तर अनेक शारीरीक समस्या निर्माण होतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. जाणून घेऊया कोणत्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या सोडून दिल्याने आपली हाडं अधिक मजबूत राहु शकतात..
बैठी जीवनशैली
ज्या व्यक्ती दिवसभर बसून असतात आणि व्यायाम करत नाहीत अशा व्यक्तींना हाडांसंबंधी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कारण मसल्सप्रमाणे हाडंही वर्कआऊट केल्याने मजबूत होतात. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात वॉकिंग, जॉगिंग, व्यायाम, योगा आदींचा समावेश करा.
अतिरीक्त मिठाचं सेवन टाळावं
जर तुम्ही जास्त मीठ घेत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक आहे. जेव्हा शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं तेव्हा हाडांच्या डेन्सिटीमध्ये घट होऊ शकते, जे धोकादायक आहे.
पाण्याची कमतरता टाळा
निरोगी हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा आहारात समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आहारामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ खा. यासह जास्तीत जास्त पाणी प्या.