..टेन्शनचीच लक्षणं आहेत ही, आजार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 04:03 PM2017-09-14T16:03:01+5:302017-09-14T16:05:27+5:30

डाग, हिरड्यांतून रक्त, खाज, खा खा, पोटदुखी.. यासारखं काही तुम्हाला होतंय?

 There are signs of tension, not a disease! | ..टेन्शनचीच लक्षणं आहेत ही, आजार नाही!

..टेन्शनचीच लक्षणं आहेत ही, आजार नाही!

Next
ठळक मुद्देएखाद्या दिवशी अचानक आपल्या चेहऱ्यावर डाग, पुरळ, फोड उमटतात.. सततच्या टेन्शननी तुमच्या चेहऱ्यावर घेतलेलं हे रुप असू शकतंं.कधीतरी अचानक हिरड्यांतून रक्त यायला लागतं.. तुम्ही सध्या फारच तणावात असल्याची जाणीव या हिरड्यांनी तुम्हाला करून दिलेली असू शकते.कधीकधी गोड किंवा जंकफूड खाल्ल्याशिवाय स्वस्थच बसवत नाही. टेन्शनमुळेही असं होऊ शकतं.

- मयूर पठाडे

सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. कसला म्हणजे कसला त्रास नाही. रोजचं कामाचं झेंगट मागे आहे, त्याच्यासाठी तर मरमर करावीच लागते, पण शारीरिक असं एकही दुखणं नाही. अधेमधे केव्हा काही तपासण्या केल्या असतील, तर त्याही सगळ्या नॉर्मल आलेल्या आहेत.. तरीही कधीतरी अचानक काहीतरी वेगळंच घडतं.. तेही फार काही सिरिअस असतं अशातला भाग नाही, पण ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा असते. वेळीच लक्ष देण्यासाठी. नाहीतर मग त्याचा भस्मासूर व्हायला वेळ लागत नाही. ही जी लक्षणं, जे संकेत आपल्याला दिसतात, त्याचा अर्थ आपल्याला अगोदरच माहीत असला तर मग त्याकडे जरा लक्षही देता येतं.
त्यासाठीच ही लक्षणं जरा समजून घेतली पाहिजेत. मुख्यत: ही लक्षणं असतात टेन्शनची, ताण-तणावाची, पण वेगळ्याच रुपात ती आपल्यासमोर येऊन उभी राहातात.. आपणही बºयाचदा त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हे दुर्लक्ष महागात पडू शकतं. त्यामुळे जाणून घ्या आपल्यातल्या तणावाची ही लक्षणं..

ही आजाराची नव्हेत, तणावाची लक्षणं आहेत..
१- एखाद्या दिवशी अचानक आपल्या चेहºयावर डाग दिसायला लागतात, चेहºयावर पुरळ, फोड उमटतात.. आपण काहीतरी थातूरमातूर घरगुती उपचार करतो, नाहीतर सोडून देतो.. जाईल आपोआप म्हणून.. पण सततच्या टेन्शननी तुमच्या चेहºयावर घेतलेलं हे रुप असू शकतं, हे लक्षात घ्यायला हवं.
२- कधीतरी अचानक हिरड्यांतून रक्त यायला लागतं.. आजपर्यंत कधीच हा त्रास नव्हता, पण आज असं कसं काय?.. अगोदरचा काहीही त्रास नसताना.. आश्चर्य व्यक्त करून किंवा एखादी गुळणी करून तुम्ही गप्प बसता.. पण ही गप्प बसण्याची गोष्ट नाही. तुम्ही सध्या फारच तणावात असल्याची जाणीव या हिरड्यांनी तुम्हाला करून दिलेली असू शकते.
३- कधीकधी काही जणांना काही गोष्टी खाण्याचे जणू डोहाळे लागतात. त्यातही गोड किंवा जंकफूड.. त्याशिवाय स्वस्थच बसवत नाही. सारखी खा खा होते आणि या गोष्टी मग आपोआप तोंडात ढकलल्या जातात. त्याची मग सवयच होऊन जाते आणि एखाद्या जागी बसलं की मग काही ना काही बोकाणा तोंडात भरणं सुरू होतं.. हे तुम्ही जाणीवपूर्वक करता असं नाही, तुमच्यातलं टेन्शन हे तुमच्याकडून करवून घेतं. बघा, तुम्ही खरंच टेन्शनमध्ये आहात का?
४- स्किनलाही आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण गेल्या काही दिवसांपासून अंगाला अचानक खाज यायला लागली आहे. त्यामुळे अस्वस्थही होतंय, पण ही खाज स्किनमधल्या प्रॉब्लेममुळे नव्हे, तर टेन्शननी तुम्हाला दिलेली सूचना असू शकते.
५- पोटदुखीचा तर अनेकांना त्रास असतो. त्यावर काहीबाही उपचारही आपण घेतो, पण काहीही फरक पडत नाही. तेवढ्यापुरेसं बरं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या. असं जर असेल, तर अगोदर आपलं टेन्शन थोडं कमी करा. निवांत व्हा. सुटी घ्या.. आणि पाहा.. तुमची पोटदुखी दूर पळालेली असू शकते. कारण ही पोटदुखी अरबट चरबट खाण्यामुळे नाही, तर तुमच्या कामाच्या रगाड्यानं तुम्हाला दिलेली भेट असू शकते..
तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींकडे द्या लक्ष. ऐका त्यांचं म्हणणं आणि व्हा निश्चिंत..

Web Title:  There are signs of tension, not a disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.