आॅफिसात कूल-कूल राहण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 08:20 AM2017-04-28T08:20:35+5:302017-04-28T13:50:35+5:30

‘वर्किंग वूमन’ला शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ही ऊर्जाच महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. आॅफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स

There are 'these' special tips to stay cool in the Ephesus! | आॅफिसात कूल-कूल राहण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स !

आॅफिसात कूल-कूल राहण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स !

Next
्याचदा ‘वर्किंग वूमन’ला आॅफिसातील कामाचा प्रचंड व्याप, तेथील पॉलिटिक्स, सहकाऱ्याचे हेवे-दावे, आॅफिसीयल टार्गेट आदी समस्यांमध्ये ती अडकलेली असते. शिवाय तिला घरदेखील सांभाळावे लागते. हे सर्व करताना महिलांना शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ही ऊर्जाच महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. आॅफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स-

* आपले मन प्रसन्न होईल, अशा काही वस्तू आपल्या डेस्कवर ठेवल्या पाहिजेत. पंधरा दिवसातून त्या चेंज केल्या पाहिजेत.  

* आॅफिसात जाताना एखाद्या दिवशी आपल्या बालपणीचे काही फोटो घेऊन जा. दुपारच्या लंच ब्रेकदरम्यान ते आपल्या सहकाऱ्याना दाखवा. यामुळे तुम्हाला व आपल्या सहकाऱ्याना बालपणीचे दिवस आठवतील. असे केल्याने नक्कीच तो दिवस आपल्यासाठी आनंदाचा ठरेल. 

* कार्यालयातील काही सहकारी मिळून एक ग्रुप तयार करावा. कार्यालयीन वेळ सोडून एकत्र येऊन एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी हा ग्रुप उपयोगी ठरु शकतो. 

* कामातून थोडा वेळ काढून आॅफिसमधील प्रत्येक क्यूबिमध्ये जाऊन आपल्या सहकाऱ्याना हाय-हॅलो केले पाहिजे. त्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते तसेच कामात मनही लागते. 

* आॅफिसच्या पॉलिटिक्समध्ये चुकूनही भाग घेऊ नका. त्यातून तुम्हाला मनस्तापाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एका सहकाऱ्याची गोष्ट दुसऱ्या सहकाऱ्याला सांगू नका. 

* आॅफिसात कुणाशी वाद करु नका. सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध जोपासले पाहिजेत. घरच्या गोष्टीचा आॅफिस कामावर व आॅफिसातील गोष्टीचा घरातील वातावरणावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घेऊन मन लावून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

Web Title: There are 'these' special tips to stay cool in the Ephesus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.