Weight loss: जर अचानक झपाट्याने होत असेल वजन कमी तर आहे गंभीर आजारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:43 PM2022-06-16T17:43:56+5:302022-06-16T17:46:29+5:30

अनेक गंभीर आजार झाल्यानंतरही वजन झपाट्याने कमी होऊ लागते. जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत, ज्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

there can be dangerous diseases if there is sudden weight loss | Weight loss: जर अचानक झपाट्याने होत असेल वजन कमी तर आहे गंभीर आजारांचा इशारा

Weight loss: जर अचानक झपाट्याने होत असेल वजन कमी तर आहे गंभीर आजारांचा इशारा

Next

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे वजन कमी होऊ लागले की त्यांना एक वेगळाच आनंद जाणवतो. याशिवाय ज्यांना वजन कमी करायचे नाही किंवा थोडे वजन कमी करायचे आहे, त्यांचे वजन अचानक कमी होऊ लागले तर ही चिंतेची बाब आहे. मात्र, अनेकजण या गोष्टीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना असे वाटते की जलद वजन कमी होणे हे त्यांच्या नेहमीच्या जीवनातील थकवा आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे झालेले असू (Causes of sudden weight loss) शकते.

अचानक वजन कमी होणं, हे शरीरातील एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे जास्त वजन कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. काळजी न घेतल्यास शरीरात गंभीर आजार वाढण्याचा धोका जास्त असतो. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अनेक गंभीर आजार झाल्यानंतरही वजन झपाट्याने कमी होऊ लागते. जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत, ज्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

कर्करोग (Cancer) -
जर आपल्या आहारात आणि दिनचर्येत कोणताही बदल होत नसेल, तरीही वजन झपाट्याने कमी होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षणही असू शकते. तुम्हाला स्वतःमध्ये किंवा इतर कोणामध्ये अशी चिन्हे दिसली तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थायरॉईड -
थायरॉईड दोन प्रकारचे आहेत, बहुतेक लोकांना हे माहीत आहे. एक ज्यामध्ये वजन झपाट्याने वाढू लागते आणि दुसरे ज्यामध्ये वजन कमी होते. थायरॉईडचा थेट परिणाम चयापचयावर होतो. थायरॉईडमुळे जेव्हा शरीरातील चयापचय मंदावते तेव्हा वजन वाढू लागते. दुसरीकडे, जर चयापचय वेगवान होऊ लागले, तर वजन वेगाने कमी होऊ लागते. सतत कमी होत जाणाऱ्या वजनामुळे काही वेळा हृदयाचे ठोके वाढणे, स्ट्रेस आणि झोप न लागणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात. ही सर्व हायपरथायरॉईडीझमची लक्षणे आहेत.

रूमेटाइड अर्थराइटिस -
संधिवात हा सांधेदुखीशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये शरीराची ऊर्जा जास्त खर्च होते, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. 30 ते 50 या वयोगटात संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. जर कोणाला सांधेदुखीसह वजन कमी होण्याची समस्या येत असेल तर ते गांभीर्याने घ्या आणि लवकर डॉक्टरांना भेटा.

पोटाशी संबंधित समस्या -
जर आपले आतडे (पोट) निरोगी नसेल, तर आपले वजन वाढण्यास काही तास लागू शकतात. कधीकधी, लॅक्टोज इनटॉलरेंस, सेलिआक आणि क्रॉन्समुळे (आतड्यांचा जळजळ) देखील वजन कमी होते. वास्तविक, अनेकवेळा आपण प्रथिने आणि इतर पोषक तत्वांनी युक्त असा आहार घेतो, असे असूनही पोटाच्या समस्यांमुळे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरात शोषली जात नाहीत, त्यामुळे कुपोषणाची समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत, डॉक्टर ग्लूटेनमुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात.

मादक पदार्थांचे व्यसन -
ज्या लोकांना मादक पदार्थांचे व्यसन आहे, त्यांचेही वजन झपाट्याने कमी होऊ शकते. वास्तविक, व्यसनाधीन लोक तासन्तास खाणे-पिणे विसरतात. नशेत असताना त्यांना काहीच आठवत नाही. नशेमुळे भूक लागत नाही आणि हळूहळू खाण्याची इच्छा होऊन भूक कमी होऊ लागते. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणं मृत्यूला आमंत्रण आहे.

Web Title: there can be dangerous diseases if there is sudden weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.