विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही!
By सुमेध वाघमार | Published: January 21, 2023 12:19 PM2023-01-21T12:19:43+5:302023-01-21T12:20:04+5:30
डॉ. कृष्णा एल्ला : डेल्टा, ओमायक्रॉनवर कोव्हॅक्सिन प्रभावी
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ या नाकावाटे देणाऱ्या बूस्टर डोसला मान्यता दिली. मात्र, आम्ही उत्पादनाचा क्षमतेत कमी पडल्याने आता फेब्रुवारी महिन्यात शासकीय केंद्रांवरही ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिली. ‘७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’मध्ये सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.
जीन थेरपी भारतात रुजावी
जीन थेरपी क्रांतिकारी आहे. ती भारतात रुजावी याकरिता वैज्ञानिक आणि सर्वांना अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एकच डोस असण्यासाठी संशोधन सुरू आहे. व्हॅक्सिन आणि संशोधनात आपण इतर देशांच्या पुढे आहे, असे डॉ. एल्ला यांनी सांगितले.
संशोधनाशी निगडित प्रोत्साहन देणारी योजना हवी!
- औषधनिर्मिती आणि संशोधनासाठी आयकरमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी डॉ. एल्ला यांनी केली.
- ते म्हणाले, येणाऱ्या बजेटमध्ये संशोधनाशी निगडित प्रोत्साहन देणारी योजना हवी. समजा एखाद्या देशाने एखादी औषधनिर्मिती विकसित केल्यास त्यावर आधारित उत्पादन भारतात करण्याचे ठरविल्यास आयकरात सूट दिली
- पाहिजे.
- यामुळे संशोधनावर आधारित क्षेत्रातील नवउद्योजक नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन पुढे येतील. जीवनावश्यक औषधींवर आयात सवलत दिली पाहिजे, असे केल्यास अनिवासी भारतीय गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असेही ते म्हणाले.