पचनक्रिया कितीही असेल खराब; तरी 'या' उपायांनी पोटाचे विकार नक्की राहतील लांब...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:39 PM2020-05-02T12:39:30+5:302020-05-02T12:41:54+5:30
लॉकडाऊनमध्ये अनेकांचा वाटेल तेव्हा खायचं आणि वाटेल तेव्हा झोपायचं असा दिनक्रम सुरू आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरीच बसण्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. बाहेर न जाता घरी लोक सुरक्षित असले तरी अनेकांना घरच्याघरी सुद्धा वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गॅस, एसिडिटी पोट साफ न होण्याची समस्या उद्भवत आहे. कारण पुरेशी हालचाल नसल्यामुळे खालेल्या अन्नाचं पचन होत नाही. परिणामी आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
तेलकट मैदायुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे ही समस्या वाढत जाते. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा वाटेल तेव्हा खायचं आणि वाटेल तेव्हा झोपायचं असा दिनक्रम सुरू आहे. पण जेवणाची वेळ फिक्स असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला पचनक्रिया चांगली राहण्याासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्हाला आपली पचनक्रिया चांगली ठेवता येईल तसंच गॅस, पोट फुगणं, अजीर्ण अशा समस्या होणार नाहीत.
लिंबू
लिंबातील औषधी गुणधर्म तुम्हाला माहितच असतील. लिंबू पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त पदार्थ समजला जातो. सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास आपली पचनशक्ती चांगली सुधारते. कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास शरीरात साठलेला मल बाहेर पडण्यास मदत होते.
धन्यांची पावडर आणि सुठ
दोन मोठे चमचे धने पावडर अर्धा चमचा सुंढ दोन ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी उकळून प्या. पाणी पूर्णपणे उकळून झाल्यानंतर थंड करून ४-४ चमचे या पाण्याचे सेवन करा. या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमची खराब पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.
दूध
पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर रात्री झोपताना एक ग्लास गरम दूध घ्या. त्याचबरोबर दुधात २ ते ३ चमचे एरंडेल तेल टाका आणि ते दूध प्या. असे केल्याने आतड्यांमध्ये साठून राहिलेला मल बाहेर येण्यास मदत होईल. याशिवाय जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रय़त्न करा. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोना संक्रमणाविरूध्द लढणाऱ्या सायकोटीनपासून शरीराला असू शकतो धोका)
खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी घाईत जेवणं टाळा. घाईघाईत खाताना प्रमाणापेक्षा अधिक खाल्लं जातं. म्हणूनच एका जागेवर शांत बसून आणि वेळेवर खायला हवं. पोट भरल्याची सूचना शरीरातील हामोर्न्स मेंदूला देतात आणि आपण गरजेपेक्षा अधिक न खाता, हवं तेवढंच खातो. तसंच हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही आपली पचनशक्ती नेहमी चांगली ठेवू शकता. ( हे पण वाचा-वाढती उष्णता आणि पित्तामुळे तुम्हालाही होऊ शकतो तोंडातील अल्सर; 'असा' करा बचाव)