जेवल्यानंतर लगेच चुकूनही करा नका या 5 चुका, फायद्याऐवजी होईल नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:36 PM2023-09-12T12:36:00+5:302023-09-12T12:36:40+5:30
After meal mistakes : जेवणानंतर तुम्ही काय टाळावं हे आज आम्ही सांगणार आहोत. जेणेकरून तुमचं आरोग्य बिघडणार नाही.
After meal mistakes : आजकालच्या धावपळीच्या जीवनात छोट्या छोट्या चुकांमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणानंतर काय करावे? काय करु नये? जेवणानंतर तुम्ही काय टाळावं हे आज आम्ही सांगणार आहोत. जेणेकरून तुमचं आरोग्य बिघडणार नाही.
1) लगेच झोपू नका
अनेकजण जेवण झाल्यावर लगेच झोपतात. मात्र, हे चुकीचं आहे. कारण अन्नाचं पचन व्हायला काही वेळ लागतो, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यासाठी थोडा वेळ घ्या. थोडावेळ फिरून या.
2) स्मोकिंग करू नये
अनेकांना जेवल्यावर लगेच सिगारेट हवी असते. पण असे करणे जास्त घातक आहे. सिगारेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणे हे जास्त धोकादायक असल्याची माहिती डॉक्टर देतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्याप्रमाणावर वाढतो.
3) आंघोळ करू नका
आंघोळ करताना पाण्यामुळे शरीरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे.
4) फळं खाऊ नका
जेवणाबरोबरच तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवण झाल्यावर एका तासाने फळे खाल्ली पाहिजेत.
5) चहा पिऊ नका
चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.