'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:08 PM2019-08-14T12:08:44+5:302019-08-14T12:10:26+5:30

अंडरगारमेंट्स म्हटलं की, महिलांमध्ये थोडीशी भिती, थोडीशी लाज असते. एवढचं नाहीतर अनेक महिला आपले अंडरगारमेंट्स धुतल्यानंतर व्यवस्थित उन्हामध्ये सुकवूही शकत नाही. अनेक महिला तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे कोणीही जाणार नाही किंवा पटकन कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी वाळत घालतात.

These 5 diseases happen to women due to undergarments | 'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...

'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...

googlenewsNext

अंडरगारमेंट्स म्हटलं की, महिलांमध्ये थोडीशी भिती, थोडीशी लाज असते. एवढचं नाहीतर अनेक महिला आपले अंडरगारमेंट्स धुतल्यानंतर व्यवस्थित उन्हामध्ये सुकवूही शकत नाही. अनेक महिला तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे कोणीही जाणार नाही किंवा पटकन कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी वाळत घालतात. पण असं करून महिला आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रणच देत असतात. अंडरगारमेंट्स जर व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत आणि व्यवस्थित कोरडे केले नाहीत तर ते अनेक आजारांना आमंत्रण देतात. पावसाळ्यामध्ये ही समस्या आणखी गंभीर होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही समस्यांबाबत सांगणार आहोत, ज्या अंडरगारमेंट्समुळे उद्भवतात. 

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

सामान्यतः ही समस्या यूरिमध्ये उद्भवते. पण याचं मुख्य कारण हायजीन न राखणं हेच असतं. जर तुमचे अंडरगारमेंट्स व्यवस्थित स्वच्छ आणि कोरडे केलेले नसतील तर यूटीआय इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. बॅक्टेरियामुळे पसरणारा हा आजार अत्यंत घातक असतो. या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य पद्धतीने अंडरगारमेंट्स स्वच्छ करा आणि व्यवस्थित उन्हामध्ये स्वच्छ करा. 

गर्भाशयाचं इन्फेक्शन

पुरूषांपेक्षा महिलांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना आरोग्याबाबात जास्त जागरूक राहण्याची गरज असते. महिलांच्या व्हजायनामध्ये होणारं इन्फेक्शन गर्भाशयाच्या रोगांना आमंत्रण देऊ शकतं. अनेकदा संक्रमण फर्टीलिटीला प्रभावित करणारं असतं. 

स्किन इंफेक्शन 

त्वचेवर होणाऱ्या संक्रमणाचं मुख्य कारण हायजीनकडे केलेले दुर्लक्षं हेच असतं. जर कपडे ओले राहत असतील तर इन्फेक्शनचा धोका अनेक पटिंनी वाढतो. व्हजायनाच्या आजूबाजूची त्वचा अत्यंत नाजूक असते. त्यामुळे तिथे स्किन इन्फेक्शन लगेच होते. 

खाज किंवा चट्टे येणं 

त्वचेच्या आजारांमध्ये खाज आणि त्वचेवर चट्टे येणं यांसारख्या समस्यांचाही समावेश होतो. एकदा या समस्या उद्भवल्या तर ठिक होण्यासाठी फार वेळ लागतो. याव्यतिरिक्त खाजेची समस्या फार वेगाने वाढते आणि दुर्लक्षं केलं तर गंभीर रूप धारण करते. 

किडनी स्टोन 

कदाचित तुम्हाला हे कळल्यावर आश्चर्य वाटेल की, किडनीचे आजार होण्यासही अनेकदा अंडरगारमेंट्स कारणीभूत ठरतात. परंतु, यामागील कारण म्हणजे, एखादं बॅक्टेरिअल इन्फेक्शन. जेव्हा हे इन्फेक्शन होतं, त्यावेळी लिव्हर आणि किडनीवर सर्वात आधी परिणाम दिसून येतात. त्यामुले किडनी स्टोनही होऊ शकतात. 

टिप : वरील सर्व समस्या या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगली असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: These 5 diseases happen to women due to undergarments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.