शरीरात भराभर रक्त वाढवतात 'ही' ५ लाल फळं, लगेच दूर होईल आयर्नची कमतरता!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:43 PM2024-10-10T13:43:32+5:302024-10-10T13:44:20+5:30

Iron Deficiency : रक्त आपल्या शरीराच्या क्रिया योग्यपणे होण्यासाठी फार महत्वाचं असतं. कारण रक्ताद्वारे शरीरात सगळीकडे ऑक्सीजन पोहोचतं. अशात आयर्नची कमतरतेकडे जास्त काळ दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

These 5 red fruits works like blood making machines iron deficiency | शरीरात भराभर रक्त वाढवतात 'ही' ५ लाल फळं, लगेच दूर होईल आयर्नची कमतरता!

शरीरात भराभर रक्त वाढवतात 'ही' ५ लाल फळं, लगेच दूर होईल आयर्नची कमतरता!

Iron Deficiency :  शरीरात रक्ताची कमतरता होणं ही एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता होते. यामुळे सतत थकवा, डोकेदुखी, भूक कमी लागणे, चिडचिडपणा, केसगळती, नखं कमजोर होणे, श्वास भरून येणे, तोंडात फोड येणे, डोक्यात चक्कर येणे, लैंगिक कमजोरी अशा समस्या होतात.

शरीरात रक्त कमी होण्याची समस्या सामान्यपणे लहान मुले, गर्भवती महिला, मासिक पाळी असलेल्या महिला, क्रोनिक डिजीज असलेले लोक यांच्यात जास्त बघायला मिळते. रक्त आपल्या शरीराच्या क्रिया योग्यपणे होण्यासाठी फार महत्वाचं असतं. कारण रक्ताद्वारे शरीरात सगळीकडे ऑक्सीजन पोहोचतं. अशात आयर्नची कमतरतेकडे जास्त काळ दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. जर तुम्हाला शरीरात रक्त कमी होऊ द्यायचं नसेल तर आम्ही तुम्हाला काही अशा लाल फळांबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होईल.

बीट

बीट या फळांमध्ये भरपूर आयर्न असतं. यात आयर्नसोबतच फोलेट आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. याच्या नियमित सेवनाने ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि शरीरात लाल रक्तपेशीही खूप वाढतात. सलाद, ज्यूस किंवा भाजीच्या रूपात याचं सेवन तुम्ही करू शकता.

लाल राजमा

लाल राजमा बरेच लोक आवडीने खातात. यात प्रोटीन, फायबर आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. याने शरीरातील आयर्नची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. राजमा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकता.

गूळ

गूळ एक नॅचरल स्वीटनर आहे. ज्यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं. याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. गुळाचं सेवन तुम्ही चहाच्या माध्यमातून किंवा थेट करू शकता. याने शरीरात आयर्न वाढतं.

डाळिंब

शरीरात आयर्न वाढवण्यासाठी तुम्ही नियमितपणे डाळिंबाचं सेवन करू शकता. या फळातून तुम्हाला केवळ आयर्न नाही तर भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही मिळतात. याचं सेवन तुम्ही ज्यूसच्या रूपात करू शकता.

लाल शिमला मिरची

लाल शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. सोबतच यात व्हिटॅमिन सुद्धा भरपूर असतं. लाल शिमला मिरचीचं सेवन तुम्ही भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये टाकूनही करू शकता.

Web Title: These 5 red fruits works like blood making machines iron deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.