दारूने सडत असेल लिव्हर तर दिसतात ही 6 लक्षण, वेळीच सावध व्हाल तर वाचाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:45 AM2023-01-24T09:45:45+5:302023-01-24T09:47:51+5:30

Liver Disease : दारू लिव्हरला वेगाने सडवण्याचं काम करते. जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होतं. जे पुढे जाऊन सिरोसिस, अल्कोहोलिक हेपेटायटिससारख्या आजारांचं कारण बनतं.

These 6 alcohol related liver disease symptoms and safe quantity for drinking | दारूने सडत असेल लिव्हर तर दिसतात ही 6 लक्षण, वेळीच सावध व्हाल तर वाचाल!

दारूने सडत असेल लिव्हर तर दिसतात ही 6 लक्षण, वेळीच सावध व्हाल तर वाचाल!

googlenewsNext

Liver Disease : लिव्हर (Liver) शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. लिव्हर केवळ 5 किंवा 6 नाही तर 500 कार्य करतं. त्यामुळे यात काही गडबड झाली तर शरीरातील सगळेच अवयव प्रभावित होतात.

लिव्हर डॅमेज कसं होतं?

दारू लिव्हरला वेगाने सडवण्याचं काम करते. जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होतं. जे पुढे जाऊन सिरोसिस, अल्कोहोलिक हेपेटायटिससारख्या आजारांचं कारण बनतं. त्याशिवाय खाणं-पिणं आणि सुस्त झालेली जीवनशैली सुद्धा लिव्हरला डॅमेज करण्याचं काम करते.

लिव्हर मजबूत करण्यासाठी काय करावं?

तशी तर लिव्हरमध्ये स्वत:हून ठीक होण्याची क्षमता असते. पण हे तेव्हा शक्य होतं जेव्हा दारूसारखे विषारी पदार्थ सोडले जातील. अशात आम्ही तुम्हाला त्या लक्षणांबाबत सांगणार आहोत, जे वेळीच ओळखले तर लिव्हरच्या घातक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो.

हॉपकिन्स मेडिसिननुसार, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की, तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन करत असाल तर स्वत:ला हे चार प्रश्न विचारा. जर यातील एकाचही उत्तर हो असेल तर तुम्ही दारू पिणं सोडण्याची गरज आहे.

1) तुम्हाला कधी असं वाटलं का की, तुम्ही दारू कमी प्यायली पाहिजे?

2) लोक तुमच्या दारू पिण्याच्या सवयीवर तुम्हाला टोकतात?

3) तुम्हाला तुमच्या दारू पिण्याबाबत कधी वाईट वाटलं?

4) तुम्ही तुमचा हॅंगओव्हर उतरवण्यासाठी सकाळी उठल्या बरोबर दारूचं सेवन केलं आहे?

हे 6 संकेत दिसले तर सोडून द्या दारू

- पोट दुखत असेल

- थकवा

- जुलाब

- भूक कमी लागणे

- विनाकारण आजारी असल्यासारखं वाटणे

दारूने लिव्हर सडलं असेल तर दिसतात ही लक्षण

- त्वचा पिवळी पडणे आणि डोळे पांढरे होणे

- पाय, टाचांवर सूज 

- पोटावर सूज

- त्वचेवर खाज

- ताप

- केसगळती

- नखांमध्ये बदल

- कमजोरी

- झोप न लागणे

- रक्ताची उलटी

- बद्धकोष्ठता

- सतत नाक वाहणे

रोज दारू प्यायल्याने होतो हा आजार

रोज दारू पिणं म्हणजे वेळेआधीच मृत्यूला कवटाळण्यासारखं आहे. कारण याने लिव्हर डिजीजसोबतच कॅन्सर, हृदयरोग, ब्रेन डॅमेजसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. 

Web Title: These 6 alcohol related liver disease symptoms and safe quantity for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.