'या' ६ गोष्टींमध्ये असतं लिंबापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली नावं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:22 IST2025-01-04T12:21:58+5:302025-01-04T12:22:36+5:30
शरीर व्हिटॅमिन सी चं उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे ते खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून मिळवता येतं.

'या' ६ गोष्टींमध्ये असतं लिंबापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली नावं!
व्हिटॅमिन सी हे शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. कारण यानेच वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी मदत मिळते. व्हिटॅमिन सी पाण्यात विरघळणारं आवश्यक पोषक तत्व आहे, जे शरीराची वेगवेगळ्या कार्यात मदत करतं. व्हिटॅमिन सी एका अॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. जे शरीराच फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात. शरीर व्हिटॅमिन सी चं उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे ते खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून मिळवता येतं.
व्हिटॅमिन सी चं नाव निघाल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी लिंबू येतं. सगळ्यांना हेच वाटतं की, लिंबामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असतं. पण आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांचं मत आहे की, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी कमी असतं. अशात त्यांनी व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या काही पदार्थांबाबत सांगितलं आहे.
व्हिटॅमिन सी भरपूर असलेले खाद्य पदार्थ
डॉक्टरांनी सांगितलं की, काही नॅचरल खाद्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जसे की, आवळा, पेरू, कोथिंबीर, कीवी, संत्री आणि हिरव्या मिरच्या. व्हिटॅमिन सी च्या गोळ्या खाण्याऐवजी तुम्ही ही फळं खाऊ शकता.
व्हिटॅमिन सी कमी असण्याचे नुकसान
शरीरात व्हिटॅमिन सी कमी झाल्यावर वेगवेगळ्या समस्या होतात. ज्यात हिरड्यांमधून रक्त येणं, जखम उशीरा भरणं, एनीमिया, थकवा, चिडचिडपणा, निराशा, सतत जखम होणं, मांसपेशींमध्ये वेदना, सतत आजारी पडणं आणि इन्फेक्शन होणं यांचा समावेश आहे.
व्हिटॅमिन सी चे फायदे
व्हिटॅमि सी शरीरात योग्य प्रमाणात असल्यावर जखमा लवकर भरतात, इम्यूनिटी वाढते, आयर्न अवशोषण होतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, हाडं मजबूत होतात, कोलेजन निर्माण होतं आणि कॅन्सरपासूनही बचाव होतो.