'हे' आहेत शेंगदाणे खाण्याचे १० फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2017 04:32 AM2017-03-06T04:32:50+5:302018-04-03T14:38:32+5:30

शेंगदाणे हा शरीरासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा तुलनेने स्वस्त आणि मोठा स्रोत आहे. १०० ग्राम शेंगादाण्यामध्ये जवळपास ५६७ कॅलरीज असतात.संतुलित शेंगदाण्याचा सेवनाचे अनेक फायदे आहेत. शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते.

These are 10 benefits of eating peanuts | 'हे' आहेत शेंगदाणे खाण्याचे १० फायदे

'हे' आहेत शेंगदाणे खाण्याचे १० फायदे

googlenewsNext
ंगदाणे हा शरीरासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा तुलनेने स्वस्त आणि मोठा स्रोत आहे. १०० ग्राम शेंगादाण्यामध्ये जवळपास ५६७ कॅलरीज असतात.संतुलित शेंगदाण्याचा सेवनाचे अनेक फायदे आहेत. शेंगादाण्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात जे शरीरातील वाईट असे LDL कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात आणि शरीरासाठी चांगले HDL कोलेस्ट्रॉल वाढवतात.

1) शेंगदाणे हे प्रोटीनचे मोठा स्रोत आहेत १०० ग्राम शेंगदाण्याच्या १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात. शेंगदाण्यात अमिनो अम्ल असतात जे वाढीसाठी आणि विकासासाठी उपयोगी ठरतात.

2) शेंगदाण्याचा सेवनाने पोटाचे आजार टळतात शेंगदाण्याच्या पॉली फेनॉलिक अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात तसेच शेंगादाण्यातील काही ठराविक घटकांमुळे पोटाचा कॅन्सरला प्रतिबंध होतो.

3) शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि मेंदूला जाणारा रक्तप्रवाह योग्य राहतो.

4) शेंगादाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते व्हिटॅमिन ई शरीरातील शरीरातील पेशींचे आवरण आणि त्वचा यांचे संरक्षण करते.

5) शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटामिन आणि अँटीऑक्सिंडट्स मोठ्या प्रमाणात असतात. 

6) शेंगदाणे खाल्याने वजन नियंत्रणात ठेवायला मदत मिळते.प्रमाणामध्ये शेंगदाणे खाणाऱ्या लोकांचे वजन अति वाढत नाही असे आढळून आले आहे.

7) जेवणानंतर ५० ते १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास तर आरोग्य चांगले राहते. खाल्लेले भोजन पचते. शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. 

8) शेंगादाण्यामध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी तुमच्या केसांसाठी उपयुक्त असतात तसेच शेंगादाण्यामधील ओमेगा ३ फॅटी ऍसिड केसांची मूळे बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

9) शेंगादाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर म्हणजेच तंतू असतात ज्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. 

10) गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करणे चांगले. यामुळे गर्भावस्थेत मुलांच्या विकासासाठी मदत होते. 

Web Title: These are 10 benefits of eating peanuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.