ऑफिस किंवा घरी कुठेही पोट फुगण्याला जबाबदार ५ कारणे, वेळीच बदला 'या' सवयी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 10:30 AM2020-02-01T10:30:19+5:302020-02-01T10:36:32+5:30
अनेक लोकांना त्यांचं जास्त वजन नसून सुद्धा पोट फुगण्याची समस्या होते. पोट कधी कधी इतकं फुगतं की, असं वाटतं आता पोट फुटेल. खासकरून हे तेव्हा जाणवतं जेव्हा तुम्ही जेवण करत असता.
(Image Credit : talescart.com)
अनेक लोकांना त्यांचं जास्त वजन नसून सुद्धा पोट फुगण्याची समस्या होते. पोट कधी कधी इतकं फुगतं की, असं वाटतं आता पोट फुटेल. खासकरून हे तेव्हा जाणवतं जेव्हा तुम्ही जेवण करत असता. पोट फुगणे ही एक अशी स्थिती आहे, ज्यात तुमच्या पोटात भरपूर गॅस तयार होतो. असं तुमच्या आहारामुळे होऊ शकतं. ज्यामागे डिहायड्रेशन, स्ट्रेस आणि पोश्चरही हेही कारणे असू शकतात.
तुमची बसण्याची पद्धत तुमचं पोट फुगण्याचं कारण ठरू शकते आणि हेच कारण आहे की, जास्तीत जास्त लोकांचं लवकर पोट फुगतं. त्यामुळे असं होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही कोणत्या चुका करत आहात याकडे लक्ष दिलं पाहिजे. या लेखात आम्ही तुम्हाला पोट फुगण्याची ५ कारणे सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही या चुका करणार नाहीत.
फायबर आणि प्रोटीन डाएट
(Image Credit : momjunction.com)
फायबर आपल्या आतड्यांसाठी अर्थातच सर्वात चांगल्या मॅक्रोन्यूट्रिएंटपैकी एक आहे. याने पचनक्रिया चांगली होते आणि वेगाने विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यामुळे एकप्रकारे याने पोट फुगण्याची समस्या दूर करण्यास मदत मिळते. मात्र, यावर तज्ज्ञांचं यावर मत आहे की, हा तर्क वाटतो तेवढा सरळ नाही. कारण फायबर मायक्रोफ्लोरा आतड्यांच्या विकासाला उत्तेजित करतं. याने फायबरला पचवल्यावर गॅस तयार होतो. एक प्रोटीनयुक्त डाएट केवळ मायक्रोबिअल विकासावर प्रभाव आणि त्याबदल्यात पोट फुगवतं. फायबर आणि कार्ब-युक्त आहार पोट फुगण्याचं कारण ठरत नाही.
एंग्जायटी
(Image Credit : tranquilityproducts.com)
आपल्या मेंदूचा आणि आपल्या आतड्यांचा थेट संबंध असतो. त्यामुळेच तुम्ही जर चिंतेत किंवा तणावात असाल तर ही बाब तुमच्या पोट फुगण्याला कारणीभूत ठरू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीनुसार, तणावात असलेले लोक प्रमाणापेक्षा जास्त हवा पोटात घेतात. ही हवा पोटात जमा होते आणि पोट फुगू लागतं. त्यासोबतच तणावामुळे आपली पचनक्रियाही असंतुलित होते. यानेही पोट फुगण्याची समस्या वाढते.
पोटात गॅस होणे सामान्य
तुम्ही यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू आपलं शरीर हे पोट फुगण्याच्या पद्धतीनेच तयार झाली आहे. जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा दोन गोष्टी होतात. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. पहिली बाब म्हणजे आतड्यांच्या मांसपेशी टाइट होतात आणि तुमचा डायफग्राम तुमच्या छातीजवळ येतो. ज्यामुळे गॅससाठी जागा तयार होते. डायफग्राफ एक अशी मांसपेशी आहे ज्याने तुमची छाती आणि पोट वेगवेगळं ठेवलं जातं. काही लोकांचा डायफग्राफ वर येत नाही, पण खाली जातो. तेव्हाही गॅससाठी जागा तयार होते आणि पोट फुगू लागतं.
जास्त मिठाचं सेवन
तुम्हाला जर वाटत असेल की, आम्ही तुमच्या आहारातील मिठाबाबत बोलत आहोत तुम्ही चुकताय. आम्ही अशा मिठाबाबत बोलत आहोत ज्यावर तुमचं लक्ष नसतं. हे मीठ तुमच्या जंक फूड आणि सर्व प्रकारच्या स्नॅक्समध्ये असतं. जे तुम्ही दिवसभर खाता. ब्रेड, चीज, सॉससारख्या फूडमध्ये मीठ असतं, पण त्याबाबत आपल्याला माहीत नसतं. वैज्ञानिक सांगतात की, शरीरात अतिरिक्त मिठाचं पाणी पोट फुगण्याचं कारण ठरू शकतं.
चुकीच्या पद्धतीने बसणे
जेवण केल्यावर तुम्ही लगेच झोपत असाल तर हे फारच चुकीचं आहे. चुकीच्या पद्धतीने बसणं गॅस तयार होण्याचं कारण ठरतं. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, गॅस जेव्हा आतड्यांमधून वेगाने पास होतो तेव्हा तुम्ही उभ्या अवस्थेत असता. जेव्हा तुम्ही सरळ अवस्थेत बसता तेव्हा पोटावर प्रेशर पडून गॅस बाहेर निघतो. पण जर तुम्ही जेवण करून झोपत असाल तर गॅस जास्त वेळ पोटात राहणार आणि याने पोट फुगणार.