किडनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:24 AM2022-12-20T11:24:50+5:302022-12-20T11:25:13+5:30

Blood clotting in Kidney : किडनी स्टोन झाल्यावर दिसणारी सगळी लक्षण ब्लड क्लॉटिंगच्या स्थितीमध्येही दिसतात. अशात स्वत:च एखाद्या निष्कर्षावर पोहोचण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि टेस्ट केली तर अधिक बरं होईल. 

These are 6 symptoms of blood clotting in kidney or renal vein thrombosis | किडनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

किडनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

Next

रीनल वेन थ्रोम्बोसिस (Renal Vein Thrombosis) एकप्रकारची रक्ताची गाठ असते. ही किडनीच्या अशा नसांमध्ये तयार होते ज्या रक्त बाहेर काढण्याचं काम करतात. किडनीमध्ये जर रक्ताची गाठ तयार झाली तर शरीरातील विषारी तत्व पूर्णपणे बाहेर निघू शकत नाहीत. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्योरचा धोका अनेक पटीने वाढतो. त्याशिवाय अनेक केसेसमध्ये ही स्थिती जीवघेणीही ठरते.

किडनी स्टोन झाल्यावर दिसणारी सगळी लक्षण ब्लड क्लॉटिंगच्या स्थितीमध्येही दिसतात. अशात स्वत:च एखाद्या निष्कर्षावर पोहोचण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि टेस्ट केली तर अधिक बरं होईल. 

रीनल वेन थ्रोम्बोसिसची लक्षणं

Webmd नुसार, किडनीमध्ये ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताची गाठ तयार होणं फारच घातक असतं. त्यामुळे याच्या संभावित लक्षणांकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. अशात तुम्ही या संकेतांकडे लक्ष ठेवू शकता.

- पोटाच्या एका बाजूला, पाय किंवा मांड्यांमध्ये वेदना

- लघवीतून रक्त येणे

- ताप

- उलटी किंवा मळमळ

- पायांवर सूज

- श्वास घेण्यास अडचण

किडनीत रक्ताची गाठ का तयार होते?

शरीरात रक्ताच्या गाठी अनेकदा अचानकच तयार होता. याचं काही स्पष्ट असं कारण नसतं. पण काही अशा गोष्टी आहेत ज्याने याची शक्यता वाढते. यात डिहायड्रेशन, गर्भ निरोधक किंवा एस्ट्रोजन थेरपी, ट्यूमर, पाठ किंवा पोटावर जखम, किडनीच्या आजाराची फॅमिली हिस्ट्री, नेफ्रोटिक सिंड्रोम आणि ब्लड क्लोटिंग डिसऑर्डर यांचा समावेश आहे.

कशी मिळते याची माहिती?

एनसीबीआयमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कंप्यूटेड टोमोग्राफी (CT) एंजियोग्राफी रीनल वेन थ्रोम्बोसिसच्या निदानासाठी सगळ्यातआधी टेस्ट करा. त्याशिवाय यूरिन टेस्ट- यूरीनालिसिस, अल्ट्रासाउंड, एमआरआयच्या माध्यमातूनही याची माहिती घेऊ शकता.

किडनीत रक्ताची गाठ होऊ नये म्हणून काय करावे?

या मेडिकल कंडिशनपासून बचाव करण्यासाठी कोणताही ठोस असा उपाय नाहीये. पण याची शक्यता कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर समस्या झाल्यावर ब्लड थिनर औषधांचं डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करा.

Web Title: These are 6 symptoms of blood clotting in kidney or renal vein thrombosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.