हे आहेत गाजराचे चमत्कारिक फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 03:38 PM2017-01-04T15:38:03+5:302017-01-04T15:47:48+5:30
हिवाळ्यात रंगीबेरंग़ी भाजीपाल्याचे सेवन करण्याची मजा काही औरच असते. त्यातच थंडीत गाजर खाणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण गाजरामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज तर असतात.....
Next
हिवाळ्यात रंगीबेरंग़ी भाजीपाल्याचे सेवन करण्याची मजा काही औरच असते. त्यातच थंडीत गाजर खाणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण गाजरामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज तर असतात शिवाय मिनरल, व्हिटॅमिन्स आणि विटॅमिन ‘ए‘ हे देखील आहेत. यासाठी आपल्या त्वचेसाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर खूपच महत्त्वपूर्ण मानले जाते. गाजराचा वापर आपण सूप, हलवा आणि सलादच्या माध्यमातूनदेखील करू शकता. गाजर फक्त स्वादातच नव्हे तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठीचे आवश्यक तत्त्व यात आहेत. शिवाय डोळ्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते.
काय आहेत गाजराचे फायदे
डोळ्यांचे आरोग्य
गाजरमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ भरपूर प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते. शिवाय यातील बीटा-केरोटिन आणि पोटॅशियमदेखील असल्याने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
त्वचेची चकाकी
रोजच गाजराचा सलाद खाल्ल्याने किंवा गाजराचा ज्यूस पिल्याने चेहऱ्यावर चकाकी येते. गाजराच्या सेवनाने रक्तातील विषाची मात्रा कमी होते. त्यामुळे मुरूमे-पुटकुळ्या आदींपासून सुटका मिळते.
मधुमेहांपासून सुटका
गाजराच्या नियमित सेवनाने त्यातील पोटॅशियम, मॅगनीज आणि मॅग्निशियममुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
कॅन्सरपासून सुटका
गाजरामध्ये कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याचेही गुण आहे. यातील कॅरोटिनाईड नावाचे तत्त्व असते जे प्रोस्टेट, कोलोन आणि स्तन कॅन्सरशी लढण्यासाठी सक्षम आहे. गाजर खाल्ल्याने आतडीचा कॅन्सर कमी होण्याचे प्रमाण सुमारे २४ टक्क्यांपर्यंत कमी होते.
हृदयरोगींसाठी फायदेशीर
गाजरामधील कॅरोटिनॉईड तत्त्व हृदयरोगींसाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे गाजराच्या रोजच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
अन्य फायदे
* गाजरच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ‘के’ असते, ज्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते आणि रक्तस्त्राव थांबतो.
* गाजरमधील विटॅमिन ‘सी’ मुळे जखम ठीक होण्यास मदत होते शिवाय हिरड्यादेखील स्वस्थ राहतात.
* गाजरमधील बीटा कॅरोटीनमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.