'हे' आहेत पावसाच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 05:11 PM2018-07-04T17:11:54+5:302018-07-04T17:18:53+5:30

पावसाळ सुरू झाला की अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. मग पावसात कोणते कपडे घालायचे? आरोग्याची काळजी कशी घ्यायची? यांसारख्या प्रश्नांचा समावेश असतो. काहींना हा पावसाळा नकोसा असतो. तर काहींना तो हवाहवासा वाटतो.

These are the beneficial benefits of rain water! | 'हे' आहेत पावसाच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे!

'हे' आहेत पावसाच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे!

googlenewsNext

पावसाळ सुरू झाला की अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. मग पावसात कोणते कपडे घालायचे? आरोग्याची काळजी कशी घ्यायची? यांसारख्या प्रश्नांचा समावेश असतो. काहींना हा पावसाळा नकोसा असतो. तर काहींना तो हवाहवासा वाटतो. पावसाळ्यात अनेक साथीचे आजारही थैमान घालतात. तसेच बऱ्याचदा पावसात भिजल्याने आपल्या सर्दी, खोकल्यासारखे आजारही होतात. परंतु या पावसाच्या पाण्याचे फायदेही आहेत. जाणून घेऊयात पावसाच्या पाण्यापासून शरिराला होणाऱ्या फायद्यांबद्दल...

1. पावसाच्या पाण्याचा केसांचे आरोग्य राखण्यासाठी फार उपयोग होतो. पावसाचे पाणी एका भांड्यात जमा करून त्याने केस धुतल्याने केस मऊ आणि आकर्षक होण्यास मदत होते. 

2. पावसाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होण्यास मदत होते.

3. पावसाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा स्वच्छ होते तर तिचे आरोग्य राखण्यासही मदत होते.  

4. पावसाचे पाणी एका स्वच्छ बाटलीत साठवून रात्री झोपण्यापूर्वी या पाण्याने तोंड धुवावे. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावरी डाग कमी होण्यासही मदत होते. 

5.  पावसाच्या पाण्याचा उपयोग पेडिक्योर करण्यासाठीही करण्यात येतो. 

Web Title: These are the beneficial benefits of rain water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.