श्वसनाच्या आजारांसह रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी खडीसाखरेचं सेवन ठरेल इफेक्टीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:51 PM2020-04-26T12:51:05+5:302020-04-26T13:07:23+5:30
खडी साखरेचं पाणी लहान मुलांना पिण्याचा सल्ला दिला जातो. पण मोठ्यांनी सुद्धा खडीसाखरेचं पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतील.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढून वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार मान वर काढत असतात. त्यातच सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या मनात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. खडी साखरेचं पाणी लहान मुलांना पिण्याचा सल्ला दिला जातो. पण मोठ्यांनी सुद्धा खडीसाखरेचं पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत खडी साखरेचे फायदे.
उष्णता कमी होते
खडीसाखरेत गोडवा असण्यासोबतच थंडावाही असतो. तापवणाऱ्या उन्हात खडीसाखरेचा वापर थंड पेय तयार करण्यासाठीही केला जातो. एक ग्लास पाण्यात खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीराला आराम मिळण्यासोबतच एनर्जीही मिळते.
तोंडातील उष्णता, अल्सर दूर करण्यासाठी
उन्हाळ्यात अनेकदा तोंडाला लालसरपणा येऊन फोड येतात. तोंडात फोडं आले असतील तर खडीसाखरेत वेलची घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट फोडांवर लावल्याने लगेच आराम मिळेल. तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. याशिवाय तोंड येण्यामुळे होणारी जळजळ आणि वेदनाही कमी होतात.
रक्ताची कमतरता दूर होते
शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खडी साखरेचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गरम दुधामध्ये केसर आणि खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीरात शक्ती आणि स्फूर्ति येते. सोबतच शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने त्वचेलाही फायदा होतो.( हे पण वाचा-कोरोनाचा रुग्ण नक्की कसा होतो बरा? आत्तापर्यंत कोरोनावर 'हे' उपचार ठरले प्रभावी)
श्वसनाच्या समस्या कमी होतात
खडीसाखरेचा उपयोग तुम्ही तुमच्या श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी करू शकता. जर तुम्हाला वारंवार श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा उपाय जरूर करा. चिमूटभर काळीमिरी आणि खडीसाखरेचे चाटण मधातून घ्या. इतकंच नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आहारात खडीसाखऱेचा समावेश करायला हवा. ( हे पण वाचा-इन्फेक्शन झाल्यानंतर २१ दिवसांपर्यंत डोळ्यात राहू शकतो कोरोना व्हायरस, 'असा' झाला खुलासा)