गुळ खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 02:56 PM2018-04-02T14:56:20+5:302018-04-02T15:01:57+5:30
गुळाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो. त्वचेसोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
गुळ केवळ एक गोड पदार्थ नाहीये तर एक अॅंटी टॉक्सीन म्हणूनही काम करतं. गुळ आपल्या शरीरातील, रक्तातील हानिकारक टॉक्सीनला बाहेर काढून त्वचेची सफाई करण्यात मदत करतो. त्यामुळे गुळाचे नियमीत सेवन केल्याने पिंपल्सची समस्याही दूर होते.आपल्या त्वचेच्या काळजीसाठी लोक सौंदर्य प्रसाधनांवर वारेमाप खर्च करतात. त्याऐवजी जर गुळाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो. त्वचेसोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
१) पिंपल्सची समस्या सामान्य आहे. खाण्यात जास्त तेल-मसाल्यांच्या उपयोगामुळे किंवा धुळीमुळे पिंपल्स येतात. जर रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर ही समस्या दूर होऊ शकते.
२) गुळामध्ये आयर्नचा समावेश असतो. त्यामुळे सकाळी-सकाळी पाण्यासोबत याचं सेवन केल्यास एनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो.
३) तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल, तेव्हाही गुळ खाणे अधिक फायदेशीर असू शकतं. थकवा जाणवल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.
४) गुळामुळे गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर होऊ शकते. जेवण केल्यानंतर थोडा गुळ खावा त्याने पचनही चांगलं होतं आणि गॅसची समस्याही दूर होते.
५) दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनाही गुळ खाणे फायद्याचे आहे. गुळामध्ये अॅंटी अॅलर्जिक तत्व असतात. जे दम्याला आराम देतात. यामुळे शरीरातील तापमानही नियंत्रीत राहतं.
६) श्वसनासंबंधी काही त्रास असेल तर त्यावरही गुळ फायदेशीर ठरु शकतो. पाच ग्रॅम गुळ तितक्याच सरसो तेलात मिसळून खावे, त्याने श्वसनाशी निगडीत समस्या दूर होऊ शकते.
७) घसा बसलावरही गुळाने आराम मिळतो. घसा बसल्यास शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे.
८) इतकेच काय तर कान दुखत असेल तर त्यावरही उपाय म्हणून गुळ वापरता येतो. गुळाला तुपासोबत मिसळून खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल.