गोड पदार्थ खाल्याने नाही तर, 'या' कारणांनी वाढतो डायबिटीजचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 06:34 PM2019-01-05T18:34:47+5:302019-01-05T18:38:11+5:30
तुम्हालाही असं वाटतं का, गोड पदार्थ खाल्याने डायबिटीज होतं? तर असं नाही आहे. डायबिटीज झाल्यानंतर गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
तुम्हालाही असं वाटतं का, गोड पदार्थ खाल्याने डायबिटीज होतं? तर असं नाही आहे. डायबिटीज झाल्यानंतर गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण गोड पदार्थ खाल्याने डायबिटीजची समस्या आणखी वाढू शकते. डायबिटीजचं मुख्य कारण खरं तर अनुवंशिकता आहे. याशिवाय दुसरी अनेक कारणंही जबाबदार असतात. परंतु, ही गोष्ट खरी आहे की, डायबिटीजच्या रूग्णांनी जर जास्त गोड पदार्थांचं सेवन केलं तर साखरेचे प्रमाण वाढते.
डायबिटीज होण्याची कारणं :
झोप पूर्ण न होणं :
कामाचा ताण आणि बदललेली लाइफस्टाइल यांमुळे लोक रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. त्यामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे डायबिटीज होण्याची समस्या वाढते.
कमी पाणी पिणं :
दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर हायड्रेट होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
उशीरा जेवण जेवणं :
रात्री उशीरा जेवण जेवल्याने शरीराचं वजन वाढतं. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होतं आणि डायबिटीजची समस्या वाढते.
लठ्ठपणा :
ज्या लोकांच्या शरीराचं वजन जास्त असतं आणि त्यासाठी काही प्रयत्न केले नाही तर डायबिटीज होण्याची शक्यता वाढते.
व्यायाम न करणं :
दररोज कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत व्यायाम करणं आवश्यक असतं. व्यायाम न केल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन लेव्हल वाढतं ज्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यताही वाढते.
गोड पदार्थ खाणं :
जेवल्यानंतर लगेचच गोड पदार्थ खाल्ले तर रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते आणि डायबिटीज होण्याची समस्या कमी होते.
हेल्दी फूड न खाणं :
आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थ म्हणजेच, हिरव्या पालेभाज्या आणि धान्य यांचा समावेश केला नाही तर ही समस्या उद्भवते. पॅकेट बंद चिप्स आणि जंक फूडचे अधिक प्रमाणात सेव केल्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.