हे संकेत दिसताच समजून घ्या हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 09:44 AM2023-03-31T09:44:51+5:302023-03-31T09:57:56+5:30

Heart attack signs : हार्ट अटॅक रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेणं आहे की, आपल्या हृदयाच्या धमण्यांमध्ये काही अडथळा तर नाही ना.

These are signs of blockage in arteries do not ignore | हे संकेत दिसताच समजून घ्या हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक

हे संकेत दिसताच समजून घ्या हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक

googlenewsNext

Heart attack signs : देशात हार्ट अटॅकच्या घटना सतत वाढत आहेत. गेल्या काही काळात अनेक प्रसिद्ध लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना समोर आल्या. ज्यात त्यांना जीव गमवावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे तरूण वयातच अनेकांना हार्ट अटॅक येत असून त्यात ते जीव गमावत आहेत. हार्ट अटॅक रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेणं आहे की, आपल्या हृदयाच्या धमण्यांमध्ये काही अडथळा तर नाही ना.

हृदयाच्या धमण्या तुमच्या शरीराच्या मुख्य रक्तवाहिन्या आहेत ज्या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात. जर यात काही गडबड झाली किंवा यात कशाप्रकारचे ब्लॉकेज आले तर सामान्यपणे तुम्हाला हार्ट अटॅकचे अनेक संकेत मिळतात.

काय मिळतात संकेत?

हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर तुम्हाला हृदयात जडपणा वाटतो. थोडी मेहनत केली तर धाप लागते आणि छातीत वेदना, अस्वस्थता जाणवते. हे हार्ट अटॅकची लक्षण असू शकतात. थकवा, धाप लागणे, हृदयाची धडधड अचानक वाढणे हेही हार्ट अटॅक येण्याचे संकेत आहेत जे धमण्या देत आहेत. त्याशिवाय हृदयरोग, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना छातीत होणारी वेदना किंवा दबाव हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो.

जर एखाद्या रूग्णाला हे संकेत दिसत असतील तर त्यांनी लगेच कार्डियोलॉजिस्ट म्हणजे हृदयाच्या डॉक्टरला दाखवावे. खाकरून जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर, डायबिटीससारख्या आजारांची फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्ही हृदयाचं पूर्ण चेकअप केलं पाहिजे. 

हार्ट अटॅक आल्यावर काय करावं?

हार्ट अटॅकच्या सुरूवातीच्या संकेतांमध्ये छातीत वेदना, जडपणा, जबडा, पाठ किंवा डाव्या हातात झिणझिण्या, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवते. असं जाणवलं तर तुम्ही लगेच मेडिकल इमरजन्सी हेल्पलाइन नंबरवर कॉल केला पाहिजे. मेडिकल हेल्प येईपर्यंत तुम्ही रूग्णाला एक एस्पिरिनची गोळी देऊ शकता.

काय आहे उपचार

असे रूग्ण ज्यांच्यात 70 टक्के कमी ब्लॉकेज आहे, त्यांच्यावर औषधांनी उपचार होऊ शकतात. लक्षणांसोबत जर 75 टक्क्यांपेक्षा अधिक ब्लॉकेज असतील तर रूग्णाला एंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागू शकते.

हृदय कसं निरोगी ठेवावं

- तंबाखूचं सेवन बंद करा

- दारूचं सेवन बंद करा

- डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी त्यांची नियमित टेस्ट करा.

- जास्त तणाव घेऊ नका

- दररोज कमीत कमी 7 ते 8 तास चांगली झोप घ्या

- हेल्दी फूड खा, जास्त मीठ खाऊ नका.

- वजन कंट्रोलमध्ये ठेवा.

- नियमितपणे एक्सरसाइज करा.

Web Title: These are signs of blockage in arteries do not ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.