दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने आरोग्याला होतात जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 10:38 AM2023-09-16T10:38:36+5:302023-09-16T10:39:04+5:30
Benefits Of Rubbing Palms: तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, यामागचं सायंटिफिक रीजन काय आहे? असं केल्याने रूग्णाला बरं वाटतं.
Benefits Of Rubbing Palms: हिवाळ्यात तुम्ही अनेकांना दोन्ही हात एकमेकांना घासताना पाहिलं असेल. हिवाळ्यात ही कॉमन बाब आहे. तसेच जर कुणाला चक्कर आली तर त्यांचेही हात किंवा पाय घासले जातात. पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, यामागचं सायंटिफिक रीजन काय आहे? असं केल्याने रूग्णाला बरं वाटतं. चला जाणून घेऊ हातांचे बोटे एकमेकांवर घासल्याने काय फायदे होतात.
1) ब्लड सर्कुलेशन वाढतं
जेव्हा आपण तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे तुमच्या शरीराला एनर्जी मिळते. तसेच यामुळे तुम्हाला चांगलंही वाटतं. अशात तुम्हाला दैनंदिन जीवनातील कामे करण्यातही काही समस्या येत नाही.
2) डोळ्यांना फायदा
हे क्वचितच कुणाला माहीत असेल, पण दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांनाही फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा तणावही कमी होतो. याने डोळ्यांच्या आजूबाजूला रक्तप्रवाह वाढतो. थकलेल्या डोळ्यांना याने आराम मिळतो. यासाठी सुरूवातीला तुम्ही हाताना हळूहळू रब करा आणि नंतर स्पीड वाढवा. जेव्हा हातांमध्ये उष्णता येईल तेव्हा ते काही सेकंदासाठी डोळ्यांवर ठेवा. याने डोळ्यांना आराम मिळतो.
3) टेंशन होईल दूर
हात एकमेकांवर घासल्याने आपल्या मानसिक आरोग्यालाही फायदे मिळतात. कारण याने मेंदू शांत होतो आणि त्याला आराम मिळतो. असं केल्याने मेंदुची क्रियाही योग्य राहते. तुम्हाला याने सकारात्मक वाटू लागतं. जर तुम्ही सकाळी उठल्यावर हॅंड रबिंग कराल तर तुम्हाला तणाव मुक्त झाल्यासारखं वाटेल.
4) हिवाळ्यात फायदा
हिवाळ्यात लोकांचे हात नेहमीच थंड होतात, थंडी घालवण्यासाठी लोक हात एकमेकांवर घासतात. असं केल्याने हातांमध्ये आणि शरीरातही उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे बोटंही आखडली जातात. अशात हात घासल्याने मसल्स अॅक्टिव होता आणि बोटांना आराम मिळतो.