जिभेवर दिसणाऱ्या व्हाइट स्पॉट्सची ही आहेत कारणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 01:27 PM2022-05-21T13:27:10+5:302022-05-21T13:27:35+5:30
Health Tips : जिभेचं काम केवळ पदार्थांच्या टेस्टची जाणीव करून देणंच नसतं तर आपल्या आरोग्याबाबतही अनेक गोष्टी जिभेमुळे समजतात.
Health Tips : जेव्हाही तुम्ही आजारी पडता तेव्हा डॉक्टर सर्वातआधी तुमची जीभ चेक करतात. कारण जिभेच्या रंगावरून अनेक आजारांची माहिती मिळू शकते. जिभेचं काम केवळ पदार्थांच्या टेस्टची जाणीव करून देणंच नसतं तर आपल्या आरोग्याबाबतही अनेक गोष्टी जिभेमुळे समजतात. तसा तर जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. पण अनेकदा जिभेवर व्हाइट स्पॉट्सही दिसतात.
जिभेवर व्हाइट स्पॉट्स दिसणं फार सामान्य आहे. पण कधी कधी हे सुद्धा गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. ज्या लोकांची इम्युनिटी कमजोर असते, त्यांच्या जिभेवरही अनेकदा व्हाइट डाग बघायला मिळतात. चला जाणून घेऊ जिभेवर व्हाइट स्पॉट्स असण्याची कारणं...
डेंटल ट्रॉमा - जर तुमचे दात टोकदार आहे आणि दातांमुळे तुमची जीभ चावली जात असेल तर याने टिशू एक जाड प्रोटेक्टिव थर ग्रो करू शकते. सामान्यपणे या स्पॉट्समुळे वेदना होत नाही. पण जर डेंटल ट्रॉमा फार जास्त इंटेस असेल तर याने तुमच्या तोंडात अल्सरची समस्याही होऊ शकते.
ट्रीटमेंट - जर तुम्हाला ट्रॉमामुळे जिभेवर व्हाइट स्पॉट्स दिसत असतील तर यासाठी सर्वातआधी जिभेवरील जखम ठीक करा. सर्वातआधी डॉक्टरांकडे जा आणि टोकदार दात बरोबर करा. जीभ चावण्याची सवय सोडा.
जिओग्राफीक टंग - जिओग्राफीक टंग एक अशी स्थिती आहे ज्यात तुमच्या जिभेच्या किनारीवर छोटे छोटे दाने दिसतात. या दान्यांमध्ये वेदना आणि जळजळ होते. सोबतच जिभेवर रेड पॅचही पडतात जे नकाशाच्या शेपचे दिसतात. या स्थितीत व्यक्तीला अन्न गिळण्यात फार अडचणीचा सामना करावा लागतो.
या समस्येमागचं एक कारण फॅमिली हिस्ट्री असू शकतं. ही समस्या घातक नसते. अनेक लोकांमध्ये जिओग्राफिक टंगची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. ही समस्या झाल्यावर काही तिखट खाल्ल्यावर जळजळ होऊ शकते.
लाइकेन प्लानस - ही फारच कॉमन समस्या आहे. ज्यामुळे तोंडात सूज आणि जळजळ होते. त्वचेवर लाइकेन प्लानसमुळे रॅशेजच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. तेच तोंडात यामुळे जळजळ आणि वेदना होते. लाइकेन प्लानसची समस्या झाल्यावर जीभ आणि गालांवर तुम्हाला रॅशेजसारखे व्हाइट पॅच दिसू शकतात. ही समस्या त्या मध्यम वयोगटातील महिलांमध्ये दिसते, ज्यांची इम्यूनिटी कमजोर असते.
प्री कॅन्सर आणि कॅन्सर - जिभेवर होणाऱ्या व्हाइट स्पॉट्सचं एक मोठं कारण प्री-कॅन्सर किंवा कॅन्सरची समस्या असू शकतं. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा जिभेवर आढळणारा सर्वात कॉमन प्रकारचा कॅन्सर आहे. ज्यामुळे जिभेवर पांढरे डाग दिसतात.