किडनी स्टोन झाल्यावर दिसतात ही लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 01:55 PM2023-08-26T13:55:45+5:302023-08-26T13:58:33+5:30

Kidney Stone Symptoms : किडनी स्टोनबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेकांना असं वाटतं की,  किडनीमध्ये स्टोन झाल्यावर केवळ पोटातच वेदना होतात. पण नेहमीच असं होत नाही. 

These are the symptoms and home remedies for kidney stones | किडनी स्टोन झाल्यावर दिसतात ही लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय!

किडनी स्टोन झाल्यावर दिसतात ही लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय!

googlenewsNext

Kidney Stone Symptoms : लघवी करताना होणाऱ्या त्रासाला अनेकजण केवळ इन्फेक्शन समजतात आणि किडनीच्या आजाराकडे लक्ष देत नाहीत. किडनी स्टोन असं काही असेल असा विचारही अनेकजण करत नाहीत आणि मग त्यांना हेच महागात पडतं. 

या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याने किडनी स्टोनची साइज आणखी वाढते आणि तुमचा त्रासही. किडनी स्टोनबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेकांना असं वाटतं की,  किडनीमध्ये स्टोन झाल्यावर केवळ पोटातच वेदना होतात. पण नेहमीच असं होत नाही. 

किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी लक्षणे असतात. त्यामुळे लघवी करताना होणाऱ्या त्रासाला केवळ यूरीन इन्फेक्शन म्हणून दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊ चार मुख्य कारणे...

लघवी करताना वेदना

जर लघवी करताना कंबर, ओटीपोट आणि पोटात वेदना होत असतील तर हे किडनी स्टोनचं लक्षण असू शकतं. या वेदना कधी कधी कमी तर कधी असह्य असतात. लघवी करताना कधी कधी रुतल्यासारखेही वाटू शकते. 

लघवीचा रंग

जर लघवीचा रंग बदलत असेल तर याकडे लक्ष द्यायला हवे. जर लघवीमध्ये रक्तासारखं काही येत असेल तर किडनी स्टोनची शक्यता वाढते. कधी कधी ब्लेडरमध्ये संकुचन निर्माण झाल्यासही लघवीतून रक्त येतं. 

कमी लघवी होणे

लघवी कमी येणे हेही किडनी स्टोनचं लक्षण मानलं जातं. असं होण्याचं कारण म्हणजे स्टोन जे किडनीमध्ये असतात ते यूरेटरमधून जातात. हे स्टोन ब्लेडरला ब्लॉक करतात. यामुळे लघवी कमी येण्याची समस्या होते. 

उल्टी आणि मळमळ

किडनी स्टोनच्या लक्षणांमध्ये मळमळ होणे आणि उल्टी होणे हेही असतात. तुमच्या किडनीला स्टोन बाधित करतं त्यामुळे असं होतं. याने पचनक्रियाही प्रभावित होते. 

काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....

1) लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल

वर्षानुवर्षे लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिश्रित करुन गॉलब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केलं जातं. पण हा उपाय किडनी स्टोनसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अॅसिडमध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा. 

2) डाळिंब

डाळिंबाचा रस आणि बीयांमध्ये अॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलडमध्येही मिश्रित करुन खाऊ शकता. 

3) कलिंगड

मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअमपासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमसोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर काढला जाऊ शकतो.

4) राजमा

राजम्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात. याला किडनी बिन्स नावानेही ओळखलं जातं. राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारांवर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो. 

Web Title: These are the symptoms and home remedies for kidney stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.