तुम्हीही ब्रश करताना 'या' चुका करता का? वेळीच व्हा सावध....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 10:16 AM2019-12-26T10:16:47+5:302019-12-26T10:22:42+5:30
अनेकजण ब्रश करताना अनेक चुका करतात, पण त्यांना हे माहीत नसतं की, या चुकांमुळे त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
हे सर्वांनाच माहीत आहे की, ब्रश करणं आपल्यासाठी किती गरजेचं आहे. सगळेच लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ब्रश करतात. पण अनेकजण असेही आहेत ज्यांना व्यवस्थित ब्रश करण्याचा कंटाळा येतो किंवा असं म्हणुया की, अनेकांना ब्रश करण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. त्यामुळे लोक ब्रश करताना अनेक छोट्या छोट्या चुका करतात. आणि याचा फटका त्यांच्या आरोग्याला बसतो.
अनेकजण ब्रश करताना अनेक चुका करतात, पण त्यांना हे माहीत नसतं की, या चुकांमुळे त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, ब्रश करण्याचा कालावधी हा साधारण दोन ते तीन मिनिटांचा असावा. पण अनेकजण ब्रश कितीतरी वेळ ब्रश करत बसतात.
दबाव देऊन ब्रश करणे
अनेक लोकांना असं वाटतं की, दातांवर दबाव देऊन ब्रश केल्याने त्यांचे दात जास्त चमकतील. पण असं काही नसतं. उलट दातांवर दबाव दिल्याने नुकसानच होतं. ब्रश करण्याची ही पद्धत फारच चुकीची आहे. लॉस एंजेलिसच्या स्कूल ऑफ डेंट्रिस्ट्रीमधील डीन डॉ. हेवलेट यांच्यानुसार, जेव्हा तुम्ही जास्त दबाव देऊन ब्रश करत असाल आणि विचार करत असाल की, असं केल्याने कीटाणू दातांमधून आणि तोंडातून बाहेर येतील तर हा चुकीचा विचार आहे. याने तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
डॉ. हेवलेट यांच्यानुसार, आपला ब्रश करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की, तोंडातील आणि दातांवरील बॅक्टेरियाचा थर दूर केला जावा. तसेच दातांना चिकटलेले पदार्थ काढता यावे. पण यासाठी तुम्हाला दातांवर दबाव टाकण्याची गरज नाही.
चुकीच्या अॅंगलने ब्रश करणे
(Image Credit : m.megacurioso.com.br)
तुम्हाला वाटत असेल की, सरळ-सरळ ब्रश फिरवून तुम्ही दात स्वच्छ करू शकाल तर तुम्ही चुकीचे आहात. वर आणि खाली दातांची चांगली स्वच्छता होण्यासाठी ब्रश व्यवस्थित पडकडे आणि दातांच्या छोट्या छोट्या गॅपमध्ये फिरवावा. कारण या गॅप्समध्येच कीटाणू जमा झालेले असतात.
टूथब्रश तोंड मोठं असणं
ब्रश असा असला पाहिजे जो तोंडात सहजपणे फिरवता येईल आणि कुठेही न लागता आरामात ब्रश करता येईल. अनेकजण मोठ्या आकाराचा टूथब्रश घेतात आणि त्यामुळे त्यांना ब्रश करण्यासाठी वेळही जास्त लागतो.
जुना टूथब्रश
अनेकजण अनेक वर्ष त्यांचा एकाच टूथब्रशचा वापर करतात, त्यांना वाटतं हा टूथब्रश अजूनही चालतो. पण ब्रश जुना झाला की, त्याचा फारसा उपयोग होत नाही. दातांना सॉफ्ट ब्रशची गरज असते. जुना ब्रश वापरून वापरून रफ झालेला असतो. तज्ज्ञांनुसार, टूथब्रश दर तीन महिन्यांनी बदलायला हवा.
ब्रश करण्याची पद्धत
ब्रश करण्याची योग्य पद्धत हीच आहे की, तुम्ही वेळोवेळी टूथब्रश बदला आणि ब्रश स्वच्छ ठेवा. जास्त लहान ब्रश घेऊ नका किंवा जास्त मोठाही घेऊ नका. दिवसातून किमान दोनदा ब्रश करावा.