या चुकीच्या सवयींमुळे हाडे होतात कमजोर, वेळीच व्हा सावध...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:30 PM2022-10-10T16:30:34+5:302022-10-10T16:31:19+5:30

Bone Damaging Habits: जर तुमची हाडे कमजोर झाली तर याने शरीरात वेदनाही होते आणि इतरही अनेक समस्या होतात. त्यामुळे हाडांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कधी कधी आपल्या चुकांमुळे हाडे कमजोर होतात.

These bad habits damage the bones of the body | या चुकीच्या सवयींमुळे हाडे होतात कमजोर, वेळीच व्हा सावध...

या चुकीच्या सवयींमुळे हाडे होतात कमजोर, वेळीच व्हा सावध...

googlenewsNext

Bone Damaging Habits: हाडे शरीरासाठी एक सपोर्ट सिस्टीम असते. हाडांनी शरीराला एक स्ट्रक्चर मिळण्यासोबतच  मसल्सनाही सपोर्ट मिळतो. तेच जर तुमची हाडे कमजोर झाली तर याने शरीरात वेदनाही होते आणि इतरही अनेक समस्या होतात. त्यामुळे हाडांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कधी कधी आपल्या चुकांमुळे हाडे कमजोर होतात. चला जाणून घेऊ अशा काही चुकीच्या सवयींबाबत ज्यामुळे हाडे कमजोर होतात.

पुरेशी उन्ह न घेणे

काही  लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ घराच्या आताच घालवतात. त्यामुळे त्यांना पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. हे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडांना योग्य प्रमाणात कॅल्शिअम मिळत नाही. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचा समावेश करा. रोज 30 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा.

जास्त वेळ बसून राहणं

काही लोक तासंतास बसून राहतात. असं केल्याने तुमच्या हाडांचं नुकसान होतं. कारण हाडे निरोगी ठेवण्यासाठी त्यांची हालचाल होणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्त वेळ एकाच जागेवर बसणं टाळा. रोज थोडावेळ एक्सरसाइज करा.

जास्त मिठाचं सेवन करणं

सोडिअम शरीरासाठी फार महत्वाचं असतं. मिठातून भरपूर प्रमाणात सोडिअम मिलतं. पण याचं जास्त प्रमाणात करणंही महागात पडू शकतं. जास्त मिठामुळे तुमची हाडे कमजोर होतात. म्हणून मिठाचं सेवन कमी करा.

सॉफ्ट ड्रिंकचं सेवन

सॉफ्ट ड्रिंक (soft drink)चं सेवन करणं अनेकांना आवडतं. पण जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंकटचं सेवन केलं तर हाडे कमजोर होतात. 

Web Title: These bad habits damage the bones of the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.